|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनच्या धमकीला तैवानचे युद्धाभ्यासाद्वारे प्रत्युत्तर

चीनच्या धमकीला तैवानचे युद्धाभ्यासाद्वारे प्रत्युत्तर 

तैपैई

 चीनच्या धमकीला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवानच्या सैन्याने यंदा मोठय़ा युद्धाभ्यासाची घोषणा केली आहे. तैवानचे सैन्य यापूर्वी देखील नियमित स्वरुपात युद्धाभ्यास करत असले तरीही यंदा चिनी आक्रमणाचा धोका पाहता याचे स्वरुप बदलण्यात आले आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रलयाचे नियोजन प्रमुख मेजर जनरल येह कुओ-हुई यांनी बुधवारी याबद्दलची माहिती दिली आहे. तैवान 1949 च्या दरम्यान झालेल्या गृहयुद्धात चीनपासून विभक्त झाला होत. चीन अद्याप या स्वायत्त बेटावर स्वतःच मालकी हक्क दर्शवित असतो. भविष्यात तैवान आपला भूभाग होईल असे चीनचे मानणे आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी मागील आठवडय़ातच गरज भासल्यास तैवानमध्ये सैन्याच्या वापराची धमकी देखील दिली होती. तैवानच्या स्वातंत्र्याच्या समर्थक अध्यक्ष साई इंग-वेन यांनी या धमकीच्या प्रत्युत्तरादाखल जिनपिंग यांच्या एकीकरणाचा प्रस्ताव नव्याने फेटाळला होता. चीनने तैवानचे अस्तित्व मान्य करावे असे साई यांनी म्हटले आहे.