|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साखळीत अल्टो कार जळून खाक

साखळीत अल्टो कार जळून खाक 

   डिचोली/प्रतिनिधी

   विठ्ठलापूर साखळी येथे काल बुधवार दि. 9 जाने. रोजी दुपारी एका अल्ट? कारने रस्त्यातच पेट घेतल्याने सदर कार पुर्णपणज जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील पच जण वेळीच खाली उतरल्याने बचावले. उपलब्ध माहितीनुसार सदर एकाच कुटुंबातील लोक कोणाच्यातरी मरणाला जात असतानाच वाटेत त्यांच्या नशीबी ही घटना ओढावली.

  ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. होंडाच्या दिशेने जात असलेली सदर जीए 08 ए 1077 ही मारूती अल्ट? कार विठ्ठलापूर साखळी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ उतरणीवर पोहोचताच पुढील भागातील बोनेटमधून धुर येऊ लागल्याने चालक दत्तराज च्यारी याने कार रस्त्याच्या बाजूला घेतली. काय झाले ते पहायचा प्रयत्न सुरू असतानाच अचानकपणे कारने पेट घेतला. त्यामुळे आतील सर्वजण क्षणाचाही विलंब न करता कारमधून खाली उतरले. या कारमध्ये एकूण पाचजण होते.

  कारने पेट घेतल्यानंतर क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. सदर आग सामान्यरित्या आटोक्मयात आणणे शक्मय नसल्याने लागलीच डिचोली अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार पुर्णपणे जळून खाक झाली होती. तरीही दलाच्या जवानांनी कारवर पाण्याचा फव्वारा मारला.

    या घटनेवेळी या रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. लोक आपली वाहने रस्त्यावर थांबवून कार जळत असल्याचे पाहत होते. मात्र ती ज्या पध्दतीने पेटत होती ते पाहता आग विझविण्याचे धाडस कोणी करू शकला नाही.  शिवाय पेट्रोल टाकी किंवा इतर कशाचाही स्फोट होण्याच्याही भितीने कोणी कारच्या जवळही गेले नाही. अग्निशामक दलाचे जवान पोहोचेपर्यंत कार पुर्ण जळून खाक झाली होती. या घटनेमुळे कार मालक दत्तराज च्यारी यांचे नुकसान झाले आहे.

   घटनेनंतर कारमध्ये असलेल्या अन्य लोकांना दुसऱया वाहनाची व्यवस्था करून पुढे पाठविण्यात आले. ते सर्वजण कोणाच्यातरी मरणाला जात असतानाच त्यांना या विपरीत प्रकाराला ,आमोरे जावे लागले. मात्र सुदैवाने कोणालाही कोणतीच इजा झाली नाही.  या घटनेचा पंचनामा साखळी पोलिस आऊट पोस्टचे हवालदार उमेश नाईक यांनी केला.