|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आत्ता गरज आहे ती माणूस वाद तयार करण्याची

आत्ता गरज आहे ती माणूस वाद तयार करण्याची 

श्रीमती प्रतिभा रानडे यांनी मांडले विचार

प्रतिनिधी/ मडगाव

Zधर्म आणि संस्कृती या हातात घालून जाणाऱया असतात. त्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यातूनच आपल्याला आयुष्याला सुरवात झाली. अनेक देशाचा व राज्याचा अभ्यास केल्यानंतर धर्म भिन्न असले तरी संस्कृतीत बरेच साम्य असल्याचे आढळून आले. विश्व चैत्यनाशी आपले नाते जुळलेच पाहिजे. त्यातूनच सगळे वाद बाद होतील. त्यातून माणूस वाद तयार करायला पाहिजे असे विचार कथाकार, कादंबरीकार, संशोधक श्रीमती प्रतिभा रानडे यांनी मांडला.

  गोमंत विद्या निकेतन आयोजित विचार वेध व्याख्यानमालेत पहिले पुष्प काल श्रीमती प्रतिभा रानडे यांनी गुंफले. त्या ‘अनुबंध धर्म संस्कृतीचे’ या विषयावर बोलत होत्या. संस्कृती विश्व हे विशाल आहे. ते एकाच धर्मग्रंथात असे बंदिस्त नाही. माणसाच्या जगण्याच्या विविध अंगाशी जोडलेले म्हणजे संस्कृती. पण, जसे जसे वैद्यानिक-तांत्रिकज्ञान वाढत गेले, त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होऊ लागले आहेत. तसे आपले जगणे ही बदलून गेले आहे. त्याचे अनेक फायदे तर आपल्याला होतच आहे. आज आपल्या नातवंडाचे कॉम्पुटर व मोबाईल शिवाय त्याचं आयुष्यच नाही.

पण, आत्ता धर्मांना भय वाटू लागलेय. त्यामुळे मनात एक शंका वाटते की, कालानुरूप बदल होण्यापेक्षा आपण अधिकच मागे जातो की, काय ? जसे पुढे जातो तसे आपण काय घालवत बसलोय, हिंदू धर्माच काय, मुस्लमान धर्माच काय, त्यामागे आहे ती वेगवेगळय़ा राष्ट्राची अस्मिता. कलांचा विकास हा होणारच आहे. त्यामुळे संस्कृतीवर परिणाम होणार आहे. मार्कस्ने जे पुस्तक लिहिले आहे. त्यात हिंदूची तत्वज्ञाने खरोखरच चांगली आहे. नंतर त्याचा मार्कसवाद झाला. आत्ता भांडवल वाद आला. तसा आत्ता धर्मवाद देखील आलाय, हा धर्म आत्ता ‘वाद’ झालेला आहे. तो सर्व जगावर आपले राज्य करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे आपण मागे रहातो की, पुढे जातो, याची फार काळजी वाटते असे श्रीमती रानडे यावेळी म्हणाल्या.

आपल्यावर जे संस्कृतीक संस्कार आहे ते कमी होत जाणार आहे का ? नितीमुल्य कमी होत जाणार आहे का ? अशी भीती वाटत आहे. शेवटी एकच प्रश्न पडतोय ईश्वरा शिवाय, धर्मा शिवाय माणूस जगूच शकत नाही का? नितीमुल्याची रचना धर्माच्या पायावर उभी केली आहे. ज्ञानाच्या पायावर नितीमुल्ये उभी करण्याची कल्पना असली पाहिजे. ज्ञान म्हणजे वैद्यानिकज्ञान नव्हे. नितीमुल्ये समाजाच्या अधिशरणाच्या ज्ञानाच्या पायावर उभी करता येईल का आपल्याला. हाच आपल्याला महत्वाचा प्रश्न वाटत आहे.

नितीमत्ता टीकवून ठेवायची असेल तर ईश्वर धर्म या कल्पानाचीच आवश्यकता आहे का ? आत्ता बदलत्या काळानुसार नितीमुल्ये बदलत चालली आहे. तर माणसांच व्यक्तीमत्व आदर्श होण्यासाठी, ईश्वर मुल्याची आवश्यकता उरते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रस्थापित धर्म, संस्कृतीत प्रभावीत असला पाहिजे, विश्व चैत्यनाशी आपले नाते जुळलेच पाहिजे. त्यातूनच सगळे वाद बाद होतील. त्यातून माणूस वाद तयार करायला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

श्रीमती प्रतिभा रानडे यांनी अफगाणीस्थान तसेच इतर देशात जे अनुभव घेतले, त्याच्या आधारे संस्कृतीचे महत्व विषद केले. धर्माच्या बंधनात अडकण्यापेक्षा, आपले जीवन समृद्ध करण्यासाठी माणूस वाद तयार करण्याची गरज व्यक्त करतानाच, हय़ाची जबाबदारी युवा पिढीने उचलणे महत्वाचे असल्याचे सांगितले.