|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » विमानाच्या टॉयलेटमधून 4 किलो सोने जप्त

विमानाच्या टॉयलेटमधून 4 किलो सोने जप्त 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे विमानतळावर कस्टम अधिकाऱयांनी मोठी कारवाई केली आहे. दुबईहून आलेल्या स्पाईस जेट एअरवेजच्या विमानाच्या टॉयलेटमधून सुमारे 4 किलो सोने जप्त करण्‍³ाात आले. जप्त करण्यात आलेले सोने तस्करी करून आणल्याचे आढळून आले. या सोन्याची किंमत 1 कोटी 29 लाख 4 हजार रुपये आहे.

मिळालेली माहितीनुसार, दुबईहून निघालेले स्पाईस जेट फ्लाईट एस जी 52 हे गुरुवारी सकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी पुणे विमानतळावर आले. पुण्याहून ते बंगलुरूला जाते. कस्टम अधिकारी तपासणी करीत असताना विमानातील टॉयलेटमध्ये काळय़ा टेपमध्ये गुंडाळून ठेवलेले हे चार सोन्याचे बार आढळून आले. त्यावर परदेशी मार्क आहे. पथकाने हे सोने जप्त केले आहे.