|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » करोडपती बनवण्याच्या आमीषाने 20 लाखाची फसवणूक

करोडपती बनवण्याच्या आमीषाने 20 लाखाची फसवणूक 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

‘तुम्ही आमच्या इंटरनॅशनल फायनाशियल मार्केट ट्रेडिंग कंपनी मध्ये पैसे गुंतवा, आम्ही तुम्हाला हजारो कोटी रूपयांचा फायदा मिळवून देवू’ असे आमिष दाववून रत्नागिरीमधील व्यक्तीला सुमारे 20 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आह़े याप्रकरणी संजय निलकंठ सावंत (62, ऱा आर्शिवाद कॉम्पेक्स, बोर्डिंग रोड, रत्नागिरी) यांनी गंडा घालणाऱया दाम्पत्याविरूद्ध तक्रार दाखल केली आह़े

    संतोषकुमार रामनरेश रघुराज सिंग (37), वंदना संतोषकुमार सिंग (34, ऱा विनायक टॉवर्स,अंधेरी, मंबई) असे गंडा घालणाऱया दोघांची नावे आहेत़  गुतंविलेल्या पैशातून आपल्याला मोठा आर्थिक लाभ होईल या प्रलोभनाला बळी पडत सावंत यांनी 2013 ते 2018 या याच वर्षांच्या काळात  15 लाख सिंग याच्या खात्यात तर 5 लाख रूपये रोख  स्वरूपात दिले होते. मात्र सहा वर्ष उलटून देखील आपल्याला कोणताही लाभ न झाल्याने सावंत यांनी पैशाची मागणी केले. मात्र सिंग याने ही मागणी धुडकावून लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार  सावंत हे रत्नागिरीतील नामांकित बँकेचे निवृत्त कर्मचारी आहेत़  त्यांचा मुलगा प्रशांत सावंत याचे मित्र चैतन्य शिर्के, गरिमा अग्रवाल यांच्या माध्यमातून सिंग दांपत्याशी त्यांची सहा वर्षापूर्वी ओळख झाली होत़ी त्यानंतर या दाम्पत्याने सावंत यांच्याशी मैत्रिपूर्ण व घरोब्याचे संबंध प्रस्थापित केल़े यावेळी या दांपत्याने इंटरनॅशनल फायनांशियल मार्केटिंग ट्रेडिंग कंपनीसाठी काम करत असून याधून अनेक लोकांना फायदा मिळवून दिला आह़े आपणही पैसे गुंतविल्यास आपल्याला हजारो काटी रूपयांचा फायदा मिळवून देऊ असे आमीष दाखवले.

    सावंत आमिषाला बळी पडल्याचे लक्षात येताच सिंग दांपत्याने त्यांना  एऩ ई़ एफ टी च्या माध्यमातून आयसीआयसीआय बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितल़े तसेच 5 लाख रोख रकमेची मागणी केल़ी त्यानुसार सावंत यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी येथील शाखेतून सप्टेंबर 2013 पासुन वेळोवेळी एकूण 15 लाख रूपये आरोपांनी सांगितलेल्या खात्यात जमा केले  व  5 लाख रूपये रोखीने दिले.

    दरम्यान लाखो रूपये भरूनही कोणताही फायदा होत नसल्याने फसवणूक झाल्याचे सावंत यांच्या लक्षात आल़े याबाबत त्यांनी या दांपत्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल़ी तसेच अज्ञातामार्फत फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आह़े याबाबत पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूद्ध भादवि कलम भादवि कलम 420, 406, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे तपास करत आहेत़