|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » जून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक ड्राप कॉल

जून-सप्टेंबरमध्ये व्होडाफोन,आयडीया नेटवर्कचे सर्वाधिक ड्राप कॉल 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

टेलिकॉम कंपन्यांनी जून-सप्टेंबर या कालावधीत सर्व्हिस बेंचमार्क क्वालिटीच्या आधारावर काहीशी ढळमळीत राहिली असल्याचे दिसून आले. यात ट्रायने आपला एक अहवाल सादर केलेला आहे. यात काही मोबाईल कंपन्याच्या कॉल सेवेत ड्राप कॉल झाले असल्याचे नोंदवण्यात आहे.

सदरची समस्या ही नेटवर्कच्या समस्येमूळे ग्राहकांना योग्य सेवा देण्यात आयडीया आणि व्होडाफोन यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे. मध्यप्रदेश, आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये आयडीयाच्या नेटवर्कची समस्या तयार झाली. तर अन्य ठिकाणी व्होडाफोनचे नेटवर्कमध्ये बिघाड होत गेल्याने कॉल ड्रापची समस्येत मोठी वाढ होत गेल्याची नोंद यावेळी केली आहे.

आयडीने तर ग्राहकांना योग्य सेवा देण्यात कमी प्रयत्न होत आहेत व त्यात ग्राहकांच्या नुकसानीची रक्कम ही परत करण्यास कंपनीकडून योग्य प्रयत्न करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण ट्रायने दिले आहे. तर दुसऱया बाजूला सरकारी बीएसएनएल कंपनीचे प.बंगालमध्ये कॉल ड्रापचे नियम पालन करण्यात कमी प्रयत्न झाले आहेत. यावर कंपनीने मोबाईल टॉवरमध्ये बिघाड होत गेल्याने ही समस्या तयार झाली असल्याचे सांगितले.