|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » बँकिंग क्षेत्रातील कमजोर कामगिरीचा बाजाराला फटका

बँकिंग क्षेत्रातील कमजोर कामगिरीचा बाजाराला फटका 

वृत्तसंस्था /मुंबई :

सध्याच्या सप्ताहातील सोमवारपासून भारतीय बाजारात सुरु असलेली घौडदौडीतील तेजीच्या प्रवासाला गुरुवारी पुर्ण विराम मिळाला आहे. यात बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरणीची नोंद करण्यात बरोबरच जागतिक पातळीवर ही कमजोर संकेता पहावयास मिळाला.

भारतीय शेअर बाजार(बीएसई) व राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मध्ये आज घसरणीची नोंद केली. बीएसईचा निर्देशांकात 100 अंकानी कमजोरी पहावयास मिळाली. तर बँकिंग शेअर्सच्या विक्रीत घटीची नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये आशिया व आंतरराष्ट्रीय बाजारातील वातावरणाचा फटका भारतीय बाजाराला बसला आहे.

बीएसईच्या दिग्गज मुख्य 30 कंपन्यांच्या निर्देशांकात 106.41 टक्क्यांनी घसरण होत 36,106.50 बंद झाला. तर एनएसईचा निर्देशांकात 33.55 अंकानी घसरण होत 10,821.60 वर बंद झाला. बाजारात बँकिंगची कामगिरी सर्वात कमजोर झाली आहे. त्यात इंडसइंड बँक, कोटक बँक, फेडरल बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक यांच्या निर्देशाकांत 2.36 टक्क्यांनी घसरणीची नोंद करण्यात आली आहे.

 दुसरीकडे ऑन्जस, मारुती सुझुकी, सन फार्मा, एचडीएफसी, हीरोमोटो,आयटीसी, आणि एचसीएल टेक यांचा निर्देशांक 1.31 टक्क्यांनी कोसळलेत. टीसीएसच्या तिमाही आकडेवारी सादर झाल्याने त्याच्या शेअर्स काही प्रमाणात खरेदीचे वातावरण राहिल्याचे पहावयास आले.  टाटा मोटर्स, एनटीपीसी, इन्फोसिस, येस बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एल ऍण्ड टी, भारती एअरटेल आणि हिंदुस्थान युनि यांच्या निर्देशांकात 1.34 टक्क्याची वधार नोंदवण्यात आली.