|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिशेल आणि मोदी मामा व्यावसायिक प्रतिस्पर्धी असल्यानेच मोदींचा आकांडतांडव : सुशीलकुमार शिंदे

मिशेल आणि मोदी मामा व्यावसायिक प्रतिस्पर्धी असल्यानेच मोदींचा आकांडतांडव : सुशीलकुमार शिंदे 

प्रतिनिधी /मुंबई :

आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  

  गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि परिसरातील काँग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून शिंदे यांनी मारहाण करणाऱया मस्तवाल पोलीस अधिकाऱयांना तात्काळ निलंबत करण्याची मागणी केली. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठय़ा प्रमाणात जनआक्रोश वाढत चालल्यानेच विरोधकांचे तोंड बंद करण्याकरिता सरकार पोलीस अंगावर सोडत आहे. परंतु लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कायदा हातात घेणाऱया पोलिसांनी सत्ता येत जात असते याची जाणीव ठेवावी असे शिंदे म्हणाले. सोलापूरला आणिबाणी सदृश्य परिस्थिती आणली गेली हे मोदी हुकुमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेल्या उचलबांगडीतून व कुणाशीही सल्लामसलत न करता जाहीर केलेल्या नोटबंदीसारख्या निर्णयातून ते आधीच दिसून आलेले आहे.