|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अनैतिक संबंधातून महिलेचा खून

अनैतिक संबंधातून महिलेचा खून 

प्रतिनिधी / रत्नागिरी :

अनैतिक संबधातून ब्लॅकमेल करत वेळोवेळी पैसे उकळणाऱया महिलेचा धारदार सुऱयाने भोसकून ट्रक चालकाने निर्घूण खून केल्याची घटना तालुक्यातील हातखंबा, तारवेवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयित ट्रकचालकाला गुरूवारी सायंकाळी अटक केली.

   खूनाची ही घटना गुरूवारी दुपारी घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी संतोष बबन सावंत (38, हातखंबा, मुळ चिपळूण) याला पोलिसांनी अटक केली आहे. शमिका शिवराम पिलणकर (32, फणसोप, टाकळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष सावंत हा हातखंबा-तारवेवाडी येथे आपली पत्नी सोनालीसह गेल्या दोन ते अडीच वर्षापासून भाडय़ाच्या घरात राहतो. तो ट्रक चालक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  गेल्या काही महिन्यांपासून संतोषच्या मित्राने त्याची शमिका पिलणकर या महिलेशी ओळख करू दिली. या ओळखीतून शमिकाचे संतोषकडे येणेजाणे वाढले. त्यातून दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले. शमिका हिने संतोषचे फोटो काढून त्या आधारे त्याला ब्लॅकमेल करत  पैसे उकळण्यास सुरूवात केली. ती वारंवार 2 ते 5 रुपयांची मागणी त्याच्याकडून करत होती, अशी माहिती पोलिसांकडून तपासात पुढे आली आहे.

  गुरूवारी दुपारी संतोषची पत्नी घरात नसताना शमिका त्याच्या घरी आली. यावेळी संतोष व शमिका यांच्यात पैशावरून बाचाबाची होऊन जोरदार वाद झाला. यावेळी रागाने बेभान झालेल्या शमिकाने घरातील धारदार सुरा घेऊन संतोषवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतोषने प्रतिकार करत तिच्याच हातातील सुऱयाने शमिकाला भोसकले. दोनवेळा धारदार सुरा शमिकाच्या पोटात खूपसून त्याने तिला संपवले, असे पोलिस तपासात संतोषने म्हटले आहे.