|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रुद्रेश्वर पणजीचे ‘विश्वामित्र प्रथम’

रुद्रेश्वर पणजीचे ‘विश्वामित्र प्रथम’ 

वार्ताहर /पणजी :

कला अकादमीने आयोजित केलेल्या 51 व्या ‘अ’ गट मराठी नाटय़स्पर्धेचा रूद्रेश्वर, पणजी यांनी सादर केलेल्या विश्वामित्र या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर ’हंस’ संगीत नाटय़ मंडळ, फोंडा यांच्या ‘अव्याहत’ या नाटय़प्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच नटरंग क्रियेशन्स नार्वे यांच्या आषाढ बार या नाटकाची पंन्नास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे तसेच प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाटय़समाज, बांदिवडे यांच्या नाटककाराच्या  शोधात सहा पात्र आणि रसरंग, उगवे, पेडणे यांच्या मुन विदाऊट स्काय या नाटकासाठी देण्यात आली आहे. या स्पर्धेत नामवंत अशा 15 नाटय़ संस्थांची उत्कृष्ट अशी नाटके सादर केली होती.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अफसर हुसेन यांना विश्वात्रित्र या नाटकासाठी प्राप्त झाले असून रोहन रविंद्र नाईक यांना अव्याहत नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक आषाढ-बार नाटकासाठी संतोष शेटकर याना देण्यात आले.

पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी दिपक आमोणकर यांना विश्वामित्र नाटकातील विश्वमित्र भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक केतन जाधव यांना अव्याहत नाटकातील उपाली भुमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे मिलिंद बर्वे (कालिदास-आषाढबार) मयुर मयेकर (लिओ-मून विदाऊट स्काय), अजित केरकर (मॅनेजर नाटककाराच्या शोधात सहा पात्र), रघुनाथ साकोर्डेकर (दासू-सलवा जूडुम), अजित कामत (माजीदचे आजोबा-मजार) आणि श्याम शेटगांवकर (शुद्रक-आषाढ बार) यांना प्राप्त झाली.