|Monday, June 17, 2019
You are here: Home » leadingnews » 92व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

92व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

 मोठ्या वादानंतर आजपासून यवतमाळमध्ये  92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. फुलांच्या पायघड्या ,ढोलताशाच्या गजरात मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली आहे.  संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते झाले आहे. वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटकाचा मान मिळाला आहे.

संत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत दुपारी 4 वाजता हे उद्घाटन पार पडणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचे  अध्यक्ष मदन येरावर यांनी सांगितले. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचे भाषण उद्घाटनावेळी वाचावे अशी मागणी होत होती. मात्र सहगल यांचे भाषण वाचले जाणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. साहित्यिक, पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, कवी यांनी बहिष्कार टाकल्यानंतर या कार्यक्रमाचं काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

साहित्य मंडळाने घटनेत बदल करुन पहिल्यांदाच निवडणुका न घेता ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांची संमेलनाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती. तसेच ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाचे उद्घाटक म्हणून आमंत्रण दिल्यानंतर वाद झाला होता. त्यामुळे आमंत्रण रद्द करण्यात आले होते. आयोजकांच्या या निर्णयाचा विरोध करत अनेक मान्यवर मंडळींनी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला.