|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभात पुणेरी पगडय़ांवरून वाद

पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभात पुणेरी पगडय़ांवरून वाद 

ऑनलाईन टीम / पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 114 वा पदवीदान समारंभ आज पार पडला. मात्र या पदवीदान समारंभावर पगडय़ांच्या वादाचे सावट होते. पारंपारिक पोषाखावर पुणेरी पगडी घालण्यास काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्याने वाद रंगला होता.

पदक आणि पुरस्कार मिळवणाऱया विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ब्रिटिश पद्धतीचा गाऊन ऐवजी कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख द्यायचा निर्णय घेतला होता. त्यासोबत पुणेरी पगडी घालण्यासही विद्यापीठाने सांगितले. मात्र त्याला काही विद्यार्थी संघटनांकडून विरोध सुरू झाला. अखेर, विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी घालण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. तरीही काही विद्यार्थी संघटनांनी पदवीदान समारंभ सुरू होताच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मंडपातून दूर करत पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्यानंतर पदवीदान समारंभ सुरु झाला. या समारंभात पदक आणि पुरस्कार मिळणाऱया विद्यार्थ्यांच्या अंगात कुर्ता-पायजमा हा पारंपरिक पोषाख होता. मात्र डोक्मयावर ब्रिटिश पद्धतीची गोल टोपी होती. पुरस्कार देणाऱया स्टेजवरील कुलगुरु आणि इतर मान्यवरांनी मात्र कुर्ता पायजमा यासह डोक्मयावर पुणेरी पगडीही परिधन केली होती.