|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू 

ऑनलाईन टीम / अकोला :

92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्‍³ाात आले. यावष संमेलनात प्रथमच संविधनाची प्रत ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचे भाषण झाले. यवतमाळ संमेलनाला राज्य शासनाकडून 50 लाख रुपये निधी मिळाला आहे. यापुर्वी संमेलनाला 25 लाख मिळत होता, असे डॉ. कोलते यांनी सांगितले.

शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रंथ प्रदर्शनास भेट दिली. तत्पूर्वी, सकाळी दहाच्या सुमारास निघालेल्या ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनातील कार्यक्रमांना सुरुवात झाली. यवतमाळच्या नागरिकांनी मोठय़ा उत्साहात ग्रंथदिंडीत सहभाग नोंदवला. यवतमाळचे रस्ते हा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दीने फुलले. शुक्रवारी सकाळी येरावार चौक येथून सुरू झालेल्या ग्रंथ दिंडीने 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची अनौपचारिक सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा सोहळा या संपूर्ण ग्रंथ दिंडीच्या मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेले 8 दिवस वादाचे सावट असले तरी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी लक्ष्मिकांत देशमुख म्हणाले. ग्रंथदिंडी मध्ये ग्रंथाच्या पालखीसह विविध संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींची झलक पाहायल मिळाली. तसेच पोलीस बँड, शिवसमर्थ ढोल समर्थपथक अशा समुहाचे सादरीकरणही झाले.

Related posts: