|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » बेस्ट संपावर तोडगा नाहीच ; उद्याही मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार

बेस्ट संपावर तोडगा नाहीच ; उद्याही मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्ट कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांचे हाल होत असताना आज संप मिटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आजही संपावर तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शनिवारीही मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. सरकार आणि महानगरपालिका कर्मचाऱयांना संप मिटल्याची घोषणा करा असा आग्रह करत आहेत. तर दुसरीकडे तोडगा निघेपर्यत संप मागे घेणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. उद्या पुन्हा राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे.

बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली. या समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन विभाग आणि नगरविकास खात्याचे सचिव या तिघांचा समावेश आहे. नवा वेतन करार आणि कनि÷ श्रेणीबाबतचा प्रश्न सोडवण्याच्या मुख्य मागणीसाठी बेस्टच्या 32 हजार कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या 3700 बस चार दिवसांपासून आगारात उभ्या असून त्याचा फटका 50 लाखांहून अधिक प्रवाशांना बसत आहे. राज्य सरकारने ‘मेस्मा’ लागू केल्यानंतरही संप मागे घेण्यात आलेला नाही. या संपाविरोधात अ‍ॅ[d. दत्ता माने यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.