|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » मराठी साहित्य संमेलन : विनोद तावडेंच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मराठी साहित्य संमेलन : विनोद तावडेंच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज दुपारी 4 वाजता उद्घाटन झाले आहे. संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या पत्नी वैशाली सुधरक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांची निवड करण्यात आली होती. मात्र, निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याने मोठा वाद उफाळला. यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला.