|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » ‘एव्हररेडी’ची लवकरच विक्री

‘एव्हररेडी’ची लवकरच विक्री 

खरेदीसाठी  शोध सुरू : शंभर वर्षाचा जुना

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

शंभर वर्षाहून अधिक कालावधीपासून बाजारात कार्यरत असणाऱया एव्हररेडी कंपनीची लवकरच विक्री करण्यात येणार आहे. या कंपनीची सुरुवात 1905 मध्ये झाली असून युनियन कार्बाइड इंडियाचे मालक यांचा दावा या कंपनीवर होता. परंतु खैतान परिवारला 1990 च्या दशकात या कंपनीवर ताबा मिळवण्यासाठी बॉम्बे डाईगचे नुस्ली वाडिया यांच्याबरोबर संघर्ष करावा लागला होता. त्यात खैतान परिवाराचा विजय झाला होता. त्यात त्यांनी 300 कोटींनी एव्हररेडी आपल्या ताब्यात घेतली.

बीएम खैतान यांची विलियम्सन मॅगर आपली फ्लॅगशीप कंपनी एव्हररेडी इंडस्ट्रीजची विक्री करण्याच्या तयारीत आहे. एव्हररेडी ड्राय सेल बॅटरी आणि फ्लॅशलाईट क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. देशातील सर्वात जुन्या ब्रॅण्डमधील एक एव्हररेडी ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो. या कंपनीच्या प्रवासाचा विचार करूनच सध्या विक्री करण्यासाठी बाजारातून बोली लावण्यासाठी बोली मागवण्यात येत आहे.

खैतान परिवाराने सध्या मुख्य बॅटरीच्या विक्रीत सुस्तपणा आल्याने व 1 हजार 500 कोटी रुपयांच्या मूळ व्यवहाराची समीक्षा करण्यात आली आहे. यातून नेहमी होणाऱया कंपनीच्या नुकसानीवर मार्ग काढण्यासाठीच हा पर्याय निवडत असल्याचे यावेळी म्हटले आहे.

उलाढाल

एव्हररेडीचा सध्याच्या व्यवहारात बदल झाल्यास कंपनी आपल्या 30 शेअर्सची विक्री करण्याची शक्यता आहे. तर प्रत्येक वर्षाला 1 अब्ज 20 कोटीहून अधिक बॅटरी व अन्य उत्पादनाची निर्मिती केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.