|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत 14 टक्क्यांची वाढ

टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत 14 टक्क्यांची वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टाटा मोटर्सने वाहन निर्मितीत मोठी क्षेप घेत असल्याची नोंद कंपनीकडून सादर करण्यात आली आहे. जागतिक पातळीवर होलसेल, रिटेल विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विक्रीच्या आकडेवारीत 13.9 टक्क्यांनी वधार होत गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात जॉग्वार लॅन्ड रोवर (जेएलआर) यांच्यातील एकूण झालेल्या विक्रीत 1,00.551 युनिट्सची विक्री डिसेंबरमध्ये झालेली आहे. टाटाच्या 2017 च्या जागतिक विक्रीतील टप्प्याचा विचार केल्यास 1,16,677 युनिट्स इतकी विक्री झाल्याचे स्पष्टीकरण कंपनीने यावेळी दिले. टाटाच्या जागतिक विक्रीत होलसेल वाहन विक्री 59,898 युनिट डिसेंबरमध्ये झाली असली तरी वर्षभरातील विक्रीची तुलना केल्यास मागील महिन्यात यात घट झाल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. तर जेएलआरचा सेल 45,474 युनिट्स, लॅन्ड रोवरच्या विक्रीत 31,386 युनिट व जॉग्वारची 14,088 वाहनांची विक्री करण्यात आलेली आहे. आगामी काळात कंपनी आपल्या भरारीचा वाढता आलेख कायम उंचावत ठेवण्याचा निर्धार केला जाणार असल्याचे म्हटले आहे.