|Saturday, May 25, 2019
You are here: Home » उद्योग » ‘इन्फोसिस’ 3 हजार 610 कोटींनी नफ्यात

‘इन्फोसिस’ 3 हजार 610 कोटींनी नफ्यात 

वर्षाशी तुलना केल्यास नफ्यात 30 टक्क्यांनी घट : तिमाही आकडेवारी सादर

वृत्तसंस्था/ बेंगळूर

देशातील दुसऱया क्रमांकावर आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱया इन्फोसिस कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर 2018 च्या तिमाहीत 3 हजार 610 कोटी रुपयांचा नफा झालेला आहे. हा नफा वर्षभरातील आकडेवारीशी तुलना केल्यास त्यात 30 टक्क्यांनी घट झाल्याची नोंद सादर करण्यात आलेल्या अहवालात केली आहे. याचा टक्का 2017 मधील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 5 हजार 129 कोटी रुपये झाल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

मागील वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात नफा नोंदवण्यात आला असून नफ्याची वाढ 20.3 टक्क्यांनी वाढून 21,400 कोटी रुपये झालेली आहे.

बायबॅकला मंजुरी

कंपनी बोर्डकडून 8 हजार 260 रुपये शेअर्सला बायबॅकसाठी मंजुरी दिलेली आहे. तर 800 रुपये प्रत्येक शेअर्सच्या हिशोबाने हा बायबॅक करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी सांगितले आहे. 4 रुपयांनी प्रत्येक शेअर्सचा स्पेशल डिव्हडेंड घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी 28 जानेवारी 2019 ला करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Related posts: