|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » उद्योग » सलग दुसऱया दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वधार

सलग दुसऱया दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वधार 

नवी दिल्ली

 पेट्रोल व डिझेलच्या दरात शुक्रवारी वाढ झाली. ही वाढ सलग दुसऱया दिवशी झाली असल्याची नोंद करण्यात आली. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलच्या किंमतीत 19 पैशानी वाढ होत 69.07 रुपये दर झाला. तर मुंबईत 19 पैशानी दर वधारत 74.72 रुपयावर पोहोचला आहे. मेट्रो शहरात डिझेलच्या किंमतीत 28 ते 30 पैशांपर्यंत वाढ झालेली आहे. तेल कंपन्या आपले दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलात झालेल्या दरातील चढ उतारावर आपल्या देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती ठरवत असते. त्यामुळे तेल दरात वाढ झाल्यास त्याचा परिणाम बाजारातील सर्व घटकावर होत असल्याची मते तज्ञांकडून मांडण्यात आली आहेत.

Related posts: