|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » विराट कोहली ‘ब्रॅण्ड मुल्या’त सलग दुसऱयादा सर्वोच्च स्थानी

विराट कोहली ‘ब्रॅण्ड मुल्या’त सलग दुसऱयादा सर्वोच्च स्थानी 

1 हजार 200 कोटींपर्यंत ब्रॅण्ड व्हॅल्यू : विराटसह अनुष्काचाही टॉप 20 मध्ये समावेश

वृत्तसंस्था\ नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली सलग दुसऱया वर्षात सेलिब्रेटी बॅण्डमध्ये सर्वोच्च स्थानी राहिला आहे. कोहलीची भारताचे सर्वोच्च ब्रॅण्ड म्हणून नोंद करण्यात आली आहे. जवळपास 1 हजार 203 कोटी रुपयापर्यंत त्याच्या ब्रॅण्डची मूल्ये आहेत. त्यापाठोपाठ दीपीका पदुकोन 721 कोटीच्या ब्रॅण्ड मूल्यासह दुसरा क्रमाक पटकावला आहे. तर शाहरुख खान यावेळीच्या यादीत पाचव्या स्थानी राहिला आहे.

जाहिरात क्षेत्रात सेलिब्रेटीच्या संख्येत सातत्याने वाढ

सदर प्रसिद्ध असणाऱया महत्वाच्या सेलिब्रेटींचा जाहिरात क्षेत्रात वाढत असणारा टक्का हा सकारात्मक असल्याचे दिसून येत असल्याचे जागतिक मुल्यमापन करणाऱया ऍड कॉर्पोरेशन फायनान्स ऍडव्हरटाईजिंगकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. सन 2017 मध्ये एकूण जाहिरात 1 हजार 660 ब्रॅण्डमध्ये सेलिब्रेटीचा सहभाग असल्याचे नोंदवले आहे. तर हाच आकडा 2007 मध्ये 650 इतकाच होता.

जाहिरात क्षेत्रात सेलिबेटीना मागणी

जाहिरात क्षेत्रात सर्वात मोठा वाटा हा सेलिब्रेटीचा असल्याचे सातत्याने पाहावयास मिळाले आहे. त्यात सिनेमा अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटसह इतर क्षेत्रातील ब्रॅण्डचे मुल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे कायम नमूद होत असल्याचे सादर करण्यात केलेल्या अहवालात नोंदवले आहे.