|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » चार दिवसांच्या तेजीत महत्वपूर्ण धातुमध्ये घसरण

चार दिवसांच्या तेजीत महत्वपूर्ण धातुमध्ये घसरण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू सप्ताहात महत्वाच्या धातुच्या विक्रीत घसरण झालेली आहे. ग्राहकांच्या मागणीत झालेल्या घटीचा परिणाम दिल्ली सोन्याच्या बाजारातील तेजीला उतरण लागली आहे. ही घट 40 रुपयापासून घसरण होत 33,030 रुपयापर्यंत प्रति 10 दहा ग्रॅमचा दर राहिला असल्याचे भारतीय सराफ संघाने नोंदवले आहे. तर औद्योगिक क्षेत्रातील होणाऱया विक्रीत ही घट झाली आहे. त्यात चांदी 60 रुपये घट होत 40,450 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या धातूच्या किंमतीत मागील चार दिवसांच्या सत्रात सोन्याच्या दरात मजबूती नोंदवली होती. परंतु कायम वापरात येणाऱया धातुंना होणाऱया मागणीत घट झाल्याची नोंद करण्यात आली.