|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रंगवैखरीः सृजनाच्या नव्या वाटा

रंगवैखरीः सृजनाच्या नव्या वाटा 

नव्वदोत्तर पिढीत लेखन-कला परंपरेबद्दल तुच्छतावाद अधिक दिसून येतो.मात्र परंपरा नीट माहिती नसेल तर नवभान देणारी नवी कला निर्मिती करता येत नाही. अशा स्थितीगततेवर नव्या पिढीसमोर रंगवैखरी एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून मराठी साहित्याची परंपरा विद्यार्थीदशेतच कृतिशीलपणे ठेवली गेली, हे या स्पर्धेचे अधोरेखित करावे असे कृतीमूल्य आहे.

 

भाषा आणि विविध ललित कला यांचे नाते घट्ट आहे. भाषेतून कला समृद्ध होत असते आणि कलेतून भाषा समृद्ध होत जाते. अखेर भाषा-कला समृद्धीतून माणूस समृद्ध होतो. मात्र या सगळय़ांना जोडणारे अभिजात साहित्य हा यातला महत्त्वाचा दुवा ठरतो. म्हणूनच उत्तम साहित्य कृतीतून उत्तम नाटय़रंग आविष्कार घडत जातो. ज्यातून आपल्या जगण्याचा नवा अर्थही लावण्याची शक्मयता प्र्राप्त होते. या पार्श्वभूमीवर राज्य मराठी विकास संस्थेने महाविद्यालयीन गटांसाठी मराठी साहित्यकृतींवर रंगवैखरी एकांकिका स्पर्धा भरवून, नव्या पिढीला नाटय़रंग आविष्काराच्या माध्यमातून सृजनाच्या नव्या वाटा शोधण्याची जी संधी दिली, हे कौतुस्कापद
आहे.

राज्य मराठी विकास संस्थेने अलीकडल्या काळात मराठी भाषेविषयी जे उपक्रम हाती घेतले आहेत ते अधिक गांभीर्यपूर्वक पुढे जाताना दिसत आहेत त्यातील  रंगवैखरी एकांकिका स्पर्धां होय! तुमचा समकालीन भवताल समजून घ्यायचा असेल, तुमचे सांस्कृतिक संचित मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत वाहते ठेवायचे असेल तर मातृभाषेशिवाय पर्याय नाही. सांस्कृतिक संचित हे त्या भाषेच्या वर्षानुवर्षाच्या कलाविश्वातून टिकून राहत असते. आणि हे कलाविश्व अधिक      प्रगल्भतेने नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर नव्या पिढीची कलादृष्टी बदलण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्य कलाकृतींकडेच वळावे लागते. त्यामुळेच राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी साहित्यावर सादर झालेल्या रंगवैखरी साखळी एकांकिका स्पर्धेने अशीच एक स्वतःची वाट  शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. माध्यमांचे बाजारीकरण, सहज उपलब्ध होणाऱया माध्यमांमुळे त्यावर व्यक्त होण्यासाठी वाढत जाणारी अधिरता, या सगळय़ाचा परिणाम म्हणून चांगल्या साहित्य वाचनापासून आजचा विद्यार्थीच नाही तर त्यांचा गुरुजन वर्गही दूर गेलेला आढळतो. अशा स्थितीत रंगवैखरीच्या माध्यमातून मराठी विकास संस्थेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी साहित्यात मानदंड ठरलेल्या सतरा लेखकांच्या साहित्यावर एकांकिका सादर करण्याची कल्पना अमलात आणली. विशेष म्हणजे हे लेखक निवडताना समाजरचनेचे सर्वस्तर भावविश्व एकांकिकांमधून कसे मांडले जाईल याचा विचार केलेला दिसतो. यातूनच मराठी विकास संस्थेचे स्पर्धा प्रमुख गिरीश पतके तसेच संचालक आणि त्यांच्या सहकाऱयांची या स्पर्धेमागील निश्चित भूमिका दिसून येते. त्या त्या प्रांतातील काही खूप चांगले लेखक ज्या प्रमाणात सर्व बोलीभाषिक वाचकांपर्यंत पोहोचायला हवे होते तसे पोहोचलेले दिसत नाहीत.

या पार्श्वभूमीवर र. वा. दिघेंसारखा कोकणातला लेखक रंगवैखरीच्या नाटय़संहितेच्या यादीत निवडला गेला आणि ज्ञानेश्वर ते आजच्या कोल्हटकर, ढसाळ, नेमाडे, शाम मनोहरांपर्यंत ही निवड केली गेल्याने मराठी साहित्याची एक सशक्त परंपरा यानिमित्ताने नव्या पिढीसमोर नीटपणे मांडली गेली. आपल्याकडे कला परंपरेला नाक मुरडणारी लेखक मंडळी विपुल प्रमाणात आहे. नव्वदोत्तर पिढीत तर हा तुच्छतावाद अधिक दिसून येतो. मात्र परंपरा नीट माहीत नसेल तर नवभान देणारी नवी लेखन निर्मिती करता येत नाही. अशा स्थितीगततेवर नव्या पिढीसमोर रंगवैखरी स्पर्धेच्या माध्यमातून मराठी साहित्याची परंपरा विद्यार्थीदशेतच कृतिशीलपणे ठेवली गेली. हेही या स्पर्धेचे अधोरेखित करावे असे कृतीमूल्य आहे. स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या लेखकांच्या कविता-कादंबरी लेखनावर नाटय़लेखन करण्यासाठी विद्यार्थी लेखकांना मुभा देण्यात आली होती. कोणत्याही लेखकाच्या कोणत्याही लेखन कृतीतील नाटय़संहिता लिहिताना विद्यार्थ्यांनी त्यातील विचारांचा गाभा महत्त्वाचा मानला. त्यामुळे स्पर्धेत एकांकिका सादर होताना त्या एकांकिकेच्या एकूण सादरीकरणाच्या परिणामांबरोबरच त्या एकांकिकेतील मूळ लेखकाच्या लेखन विचारांचा विद्यार्थ्यांनी कसा स्वीकार केला यालाही महत्त्व प्राप्त होत गेले. या सगळय़ामुळे नाटय़कलाकृतीत फक्त उत्तम सादरीकरण महत्त्वाचे नसते, हेही तरुणाईच्या लक्षात आलेच, परंतु संहिता लेखनाचे अधिक स्वातंत्र्य मिळाल्याने तरुणाईच्याही विचार कल्पकतेला अधिक वाव मिळत गेला. यातून नाटय़मांडणीच्या अधिक शक्मयताही त्यांना तपासता आल्या. या एकांकिका सादरीकरणामध्ये चित्र, शिल्प, नृत्य, संगीत कलांचा वापर करणे बंधनकारक होते. मुलांच्या जडणघडणीच्या काळात साहित्याबरोबर इतर कलांचीही विचार जाणीव प्र्रगल्भ होत जावी असाच उद्देश   राज्य मराठी विकास संस्थेचा यामागील असावा. साहित्याबरोबरच चित्र, शिल्प, नृत्य, संगीत आदी कला माणसाला डोळस बनवतात. हे डोळस बनवणे फक्त त्या त्या कलेपुरते मर्यादित नसते. तर याचा एकूण परिणाम तुमच्या जीवन जाणिवांवर होत असतो. यातूनच रंगवैखरीच्या सादरीकरणामध्ये या कलांचा समावेश करण्यात आला याचे महत्त्व अधोरेखित होते आणि अपवाद वगळता एकूण सादर झालेल्या एकांकिकांमध्ये या कलांचा वापर सहजरीत्या मूळ संहितेला धरून केला गेला होता. कला सादर करताना त्या काळाचे भान महत्त्वाचे असते. तसे नसेल तर ती कला फक्त एक मनोरंजन ठरते. रंगवैखरीमधील एकांकिका सादरीकरणामध्ये आजच्या गुंतागुतीचा धागा प्रभावीपणे जोडला गेलेला दिसला. त्यामुळे तरुणाईने एकांकिका सादरीकरणात किती वस्तुनि÷ विचार केला हेही स्पष्ट होते. राज्य मराठी विकास संस्थेने पहिल्या वषी महाराष्ट्राच्या विविध भागातील एकांकिका सादरीकरणासाठी केंदे निवडली होती. यावषी पुढचे पाऊल टाकत बेळगाव आणि गोवा या भागातील मराठी भाषिकांसाठी तेथील केंद्रांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या वषीपेक्षा या दुसऱया वषी महाविद्यालयांचा चांगला प्र्रतिसाद मिळाला आणि बेळगाव, गोवा केंद्रावर या स्पर्धेच्या माध्यमातून मातृभाषाभिमान जागृत ठेवण्यात आला. सर्व केंद्रांवर सादर झालेल्या एकांकिका स्पर्धांमधील विद्यार्थी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि स्पर्धेकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनही गंभीर होता. म्हणूनच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेबद्दल दिलेल्या प्र्रतिक्रियांमध्ये या स्पर्धेमुळे ‘मराठी भाषा साहित्याचा, या साहित्य परंपरेचा अभ्यास करता आला’, अशा राज्य मराठी विकास संस्था स्पर्धा आयोजित करून नेमका उद्देश गाठू पाहणाऱया प्रतिक्रियेचाही समावेश होता. त्यामुळेच रंगवैखरी स्पर्धा खऱया अर्थाने यशस्वी झाली असेच म्हणावे लागेल.