|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कडकनाथ कोंबडी पालनातून ग्रामीण तरुणांना रोजगार संधी

कडकनाथ कोंबडी पालनातून ग्रामीण तरुणांना रोजगार संधी 

सतीश पाटील/ शिये

एका कंपनीच्या ” कॉन्ट्रक्ट फार्मींग ” व्यवसाय पद्धतीने ग्रामीण  भागांतील तरुणांना कडकनाथ कोंबडी पालनांतून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.दोनशे कोंबडय़ांच्या पालनांतून महीना 15 ते 20 हजार रुपयांचे उत्पादन मिळते. सध्याच्या फास्टफूड्च्या जमान्यात काय खावे ,काय खाऊ नये.शाकाहार का मासांहर असे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये शाकाहारी जेवणामध्ये  येणार्या  भाजीपाल्यावर औषध फवारणीमुळे होणारे आजार  बघता लोकांचा कल सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला व फळे खाण्याकडे कल वाढलेला आहे.तसेच मांसाहार करणाऱयामध्ये मटण आणि बॉयलर चिकनचा समावेश आहे. हॉटेलमध्ये मिळणारे मटन नेमके कशाचे आहे. याबाबत शंका असल्याने मासांहर करणारे चिकन जादा पंसंती देतात.पण बॉयलर कोंबडी हि बहुतांश औषधावर मोठी केली जाते आणि त्यामुळे खाणाऱयांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे तज्ञांचे मत आहे . त्यामुळेच मांसाहार करणारे खवय्ये कडकनाथ कोंबडी खाण्यासाठी पंसंती देत असल्याचे चित्र आहे .

     दरम्यान, भुये (ता. करवीर ) येथील पक्षी पालक विश्वास पाटील यांच्याशी ” कडकनाथ कोंबडी पालनातून विषयी चर्चा केली असता कडकनाथ कोंबडी पालनांचा व्यवसाय करण्यासाठी कमीत – कमी 20स20 च्या जाळी मारलेल्या शेडची गरज आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी पाणी व लाईटची व्यवस्था असणे गरजेचे आहे. अशी सुविधा असणाऱयांना व  कडकनाथ कोंबडी पालनांचा व्यवसाय करणाऱयांना कंपनी कडून सुरुवातीला 200 लहान पक्षी देण्यात येतात. त्यांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक असणारे    पशुखाद्य,औषधे, डॉक्टर सेवा कंपनीच्यावतीने  पुरविली जाते. हे पक्षी साडे चार ते पाच महिन्याचे झाले की त्यांच्यापासून अंडी देण्यास सुरुवात होते. या दोनशे पक्षांकडून वर्षा भरात सुमारे 7500 अंडय़ांचे उत्पादन होते .त्यानंतर कंपनी 7500 अंडी व सर्व पक्षी घेऊन जाते.आणि त्यामागचा सुमारे दोन लाख इतका नफा पक्षूपालकास दिला जातो.आणि परत त्याच्या मागणी प्रमाणे लहान पक्षी दिले जातात. या कोबंडीची अंडी मार्केटमध्ये 20 ते 50 रुपये पर्यंत विकली जातात तर एक कोंबडी साईज प्रमाणे 375 ते 400 रुपये पर्यंत विकली जाते.

 तंदुरुस्तीसाठी तज्ञांचा विराट कोहलीला कडकनाथ चिकन खाण्याचा सल्ला

भरतीय क्रिकेट टिमचा कर्णधार विराट कोहली व त्यांचे संघसहकारी यांच्या आहारात ग्रिल्ड चिकन असते या चिकनमुळे कोलेस्टॉर आणि फॅटस् जास्त असल्याने ते शाकाहारी जेवण करण्याचा विचार करत होते. त्यापेक्षा खुपच कमी कोलेस्टॉर आणि फॅटस् असणारे कडकनाथ चिकन खाण्याचा सल्ला तज्ञ्यांकडून देण्यात आला. तसेच यामध्ये लोह व प्रथिने यांचे जास्त प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तज्ञांच्या मते एक किलो कडकनाथ चिकनमध्ये कोलेस्टॉरचे प्रमाण 184 मिलीग्रॅम इतके आहे तर साधारण चिकनमध्ये हे प्रतिकिलो प्रमाण 214   मिलीग्रॅम इतके आहे.तर साधारण चिकनमध्ये  प्रथिनांचे प्रमाण 16 ते 17 इतके टक्के आहे. तर कडकनाथ चिकनमध्ये प्रथिनांचे प्रमाण 25 ते 27  इतके टक्के आहे.तर कडकनाथ चिकनमध्ये फॅटस् केवळ 1 टक्के आहे.इतर चिकनमध्ये 5 ते 6 टक्के फॅटस् आहे,  असाही तज्ञांचा दावा आहे.

सध्या भुयेत विश्वास हिंदुराव पाटील , भुयेवाडीत जयवंत भानुदास चौगले आणि वडणगेत सागर दिंडे यांनी कडकनाथ कोंबडी पालन केले आहे. याच्यांपासून प्रेरणा घेऊन येत्या महिन्याभरात दहा ते पंधरा तरुण हा  व्यवसाय सुरू करणार आहेत.