|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चिंतनातूनच माणूस समाजात मोठा होतो : प्रा. अनिल भागाजे

चिंतनातूनच माणूस समाजात मोठा होतो : प्रा. अनिल भागाजे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

प्रत्येकाने वाणी आचार विचारातून समाजामध्ये स्वतःची ओळख बनवावी. गरीब व श्रीमंतीची तुलना करू नये. नम्रता, संयम, परोपकार आदी गुण आत्मसात करुन माणुसकीने वागावे. चिंतन करणाराच माणूस समाजात मोठा होतो, असे मत प्रा. अनिल भागाजे यांनी व्यक्त केले. ते गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना, 2 स्तर विशेष श्रमसंस्कार शिबिर, दोनवडे येथे व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. गडकरी होते.

दोनवडे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सारीका जाधव, उपसरपंच प्रियांका शिंदे, प्राचार्य डॉ. ए. बी. गडकरी, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, बाजीराव मगाणें (पोलीस पाटील), यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या शिबिरातंर्गत गावातील रस्त्यांची स्वच्छता, गटारी स्वच्छता, शाळा, मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण शैक्षणिक स्तर सर्व्हे, हळदी कुंकू कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सुरक्षा कायदे, कन्या वाचवा, पर्यावरण जनजागृती विषयावर आधारीत उपक्रम राबविले गेले.

तसेच प्रा. भिकाजी लाड (घराचं घरपण व गावाचं गावपण हरवत चालयं.) वसंत बाबर (पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी महिला अत्याचार व सायबर गुन्हे), प्रा. डी. डी. कुडाळकर (या जगण्यावर शतदा प्रेम करावे), शाहीर आझाद नायकवडी (पोवाडय़ातून समाजप्रबोधन), प्रा. अनिल भागाजे (जगणं सुंदर आहे) प्रा. कृष्णात बसागरे (माझी गाणी, माझी वाणी हसारे गामा) आदिंची व्याख्याने झाली.

 कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्रा. डॉ. सौ. मंजिरी मोरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक प्रा. एस. एन. मोरे, प्रकल्प अधिकारी प्रा. रवींद्र सुतार, प्रा. सचिन शिंदे, प्रा. प्रमोद झावरे, माजी सरपंच संजय पाटील, सरदार पाटील, माजी उपसरपंच आनंदा कदम, संभाजी पाटील, वसंत पाटील, बाळासाहेब पाटील, एन. एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित ाsते.