|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » विदेशी चलनसाठा 396 अब्ज डॉलर्स पार

विदेशी चलनसाठा 396 अब्ज डॉलर्स पार 

नवी दिल्ली

 भारताच्या विदेशी चलन साठय़ात उत्तरोत्तर वाढ होत असून आता तो 396.084 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचला आहे. रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली. गेल्या आठवडय़ात चलनसाठय़ात 11.64 कोटी डॉलर्सची भर पडली. एप्रिलमध्ये हा साठा 468 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहचला होता. नंतर कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्याने त्यात घट झाली. आता तो पुन्हा वाढू लागला आहे. रूपयाच्या किमतीचाही परिणाम विदेशी चलनसाठय़ावर होत असून आता स्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.