|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अपघातात वंजारवाडीचे दोघे ठार

अपघातात वंजारवाडीचे दोघे ठार 

वार्ताहर / मांजर्डे

आरवडे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी झालेल्या अपघातात वंजारवाडी (ता. तासगाव) येथील विनोद अरुण चवदार (वय 21) जागीच आणि दत्तात्रय शामराव खरमाटे (वय 20 ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनोद व दत्तात्रय हे दोघे शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान तासगावकडून आरवडेगावाच्या दिशेने कामानिमित्त आपल्या होंडा शाईन दुचाकी गाडीवरून क्रमांक (एमएच 10 बी के 697)  चालले होते. ते आरवडे हद्दीत रामबाग जवळ आले असता अज्ञात वाहनाचा व दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकी चालक असणाऱया विनोदच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेला दत्तात्रय खरमाटे  बाजूला पडल्यामुळे गंभीर जखमी झाला. जखमीला खासगी वाहनातून तासगाव येथील दवाखान्यात आणि तेथून मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान त्याचाही रात्री मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. घटनास्थळावर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. अपघाताची तासगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास हावलदार पी. एच.तुपे, कॉन्स्टेबल आर.एम.माळी करीत आहेत.