|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खासदार ओवेसीं गांधी मैदानावरुन देणार भाषण

खासदार ओवेसीं गांधी मैदानावरुन देणार भाषण 

प्रतिनिधी/ सातारा

संविधान के सन्मान मे वंचित बहुजन आघाडी मैदान मे चा नारा देत वंचित बहुजन आघाडीने साताऱयाच्या गांधी मैदानावर येवू घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या अनुषंगाने प्रथमच भारतातील वादग्रस्त व्यक्तीमत्व एमआयएमचे खासदार ओसुद्दीन ओवेसी हे साताऱयात येणार आहेत. दि.25 रोजी महाअधिवेशनाच्या निमित्ताने गांधी मैदानावरील व्यासपीठ गाजवणार आहेत. ते नेमके काय बोलतील, कसे बोलतील याकडे जिह्यातील राजकारणी मंडळींसह अवघ्या सातारवासियांनी कान टवकारले आहेत. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचेही संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर हेही दुसऱयांदा साताऱयात येणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे.

आपल्या वक्तव्यांना सतत वादग्रस्त ठरलेले खासदार ओसुद्दीन ओवेसी हे सातारा जिह्यात प्रथमच येत आहेत. दि.25 रोजी साताऱयात महाअधिवेशन होत आहे. त्या अधिवेशनात प्रमुख मान्यवर म्हणून त्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर हे पालिकेच्या निवडणूकीवेळी सव्वा दोन वर्षापूर्वी साताऱयात आले होते. त्याची गुरुवार परजावर जाहीर सभा सायंकाळी झाली होती. तेव्हाही त्यांनी साताऱयातील खासदार उदयनराजे यांच्यासह तात्कालिन विद्यमान परिस्थितीवर भाष्य केले होते. त्यावेळी भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार हे उमेश त्रिंबके हे होते. आता गांधी मैदानावर होणाऱया या महाअधिवेशनाच्या तयारीला साताऱयातील भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते म्हणून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, माजी आमदार लक्ष्मण माने, गणेश भिसे, सिद्धार्थ खरात, अलताफ शिकलगार, भरत लोकरे, सतीश रावखंडे, इप्बाल मोमीन, रामचंद्र नलावडे, बबनराव सुतार, संदीप कांबळे यांच्यासह कार्यकर्ते झटत आहेत.

चंद्रकांत खंडाईत यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, भारतामध्ये संविधानिक लोकशाही येवून 68 वर्षे झाली. या 68 वर्षाच्या राजकीय व्यवस्थेत सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टय़ा वंचित समाजाला राजकीय अस्तित्व निर्माण करता आले नाही. याची कारणे असू शकतात. पण आमच्या दृष्टीने जातीव्यवस्था ही राजकारणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. आजही वरच्या जातीचे नेतृत्व मान्य केले जाते. खालच्या जातीचे नेतृत्व मान्य केले जात नाही. त्यामुळे 85 टक्के बहुजन समाज प्रस्थापित पक्षांच्या प्रभावाखाली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर, औरंगाबाद, पुणे येथे मोठया सभा झाल्या असून त्याचाच भाग म्हणून साताऱयाच्या भूमीत शुक्रवार दि. 25 रोजी ही जाहीर सभा होत आहे. या सभेला सातारकरांनी आर्वजून उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.