|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » संक्रांत महोत्सवात खरेदीसाठी जोरदार प्रतिसाद

संक्रांत महोत्सवात खरेदीसाठी जोरदार प्रतिसाद 

प्रतिनिधी/ सातारा

खास मकरसंक्रांत सणानिमीत्त श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने सातारा शहरात खास करुन महिलांनी बनवलेल्या नाविण्यपुर्ण वस्तू, खाद्यपदार्थ आणि मालाच्या विक्रीसाठी दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत पुष्कर मंगल कार्यालय येथे संक्रांत महोत्सव 2019 या प्रदर्शनाचे आयोजन आले आहे. या प्रदर्शनात संक्रांतीचे वाण, हस्तकलेच्या आकर्षक वस्तूंसह विविध वस्तू, कपडे आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी जोरदाप प्रतिसाद मिळत आहे. 

ग्राहकांना नाविण्यपुर्ण वस्तू आणि उच्चतम दर्जाचा माल एकाच छताखाली मिळावा तसेच चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची चव चाखता यावी यासाठी सलग पाच दिवस या प्रदर्शनाचे आयोजन फेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. या प्रदर्शनात महिला उद्योजक आणि गृहिणींनी बनवलेल्या सर्वप्रकारच्या दर्जेदार वस्तू, खाद्यपदार्थ आणि माल एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे या खास प्रदर्शनाचा लाभ ग्राहकांनी आणि मकरसंक्रांतीचा आनंद वेगळ्यापध्दतीने साजरा करण्यासाठी या प्रदर्शनाला खास करुन महिलांची जोरदार गर्दी होत आहे. 

प्रदर्शनाचे उदघाटन प्रदर्शनात सहभागी दिव्यांग संस्थेच्या स्टॉलचे चालक असलेले इंगवले या अंध बांधवाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. वेदांतिकाराजे यांच्यासह फेडरेशनच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. प्रदर्शनात संक्रांत सणासाठी लागणार्या विविध वस्तू, वाण, हळद-कंकू करंडे, मातीची भांडी यासह विविध प्रकारचे कपडे आणि खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामुळे सहभागी महिलांना उद्योगवाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देवून महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले आहे.