|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयटी पार्कमुळे रोजगार निर्मितीवर भर

आयटी पार्कमुळे रोजगार निर्मितीवर भर 

प्रतिनिधी/ पणजी

 चिंबल व पर्वरी येथे होणारे आयटी पार्क हे पर्यावरणाचे संरक्षण व रोजगार निर्मितीवर भर देणार आहेत. या प्रकल्पाविषयी श्वेत पत्रिकाही चिंबल जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे विनाकारण याला विरोध करु नये, असे यावेळी आयटी मंत्री रोहन खवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 चिंबलचा कदंब पठारावर होणारा आयटी पार्क हा पर्यावरण पुरक असणार आहे. ईमारतीही आधुनिक पद्धतीने बांधल्या जाणार आहे. या ठिकाणी असलेले तळे हे आयटी पार्क पासून सुमारे 400 मीटर दूर असल्याने या तळय़ाला याचा काहीच परिणाम होणार नाही. सुमारे 12 एकर जमिनीमध्ये हा प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पामुळे चिंबलवासियांना सर्व आधुनिक सवलती  व सवलती पुरविल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे गावातील लोकांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वयंरोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे, असे यावेळी खवटे यांनी सांगितली.

9 हजार नोकऱया उपलब्ध

 चिंबल व पर्वरी येथे होणाऱया या दोन्ही आयटी प्रकल्पातून सुमारे 9 हजार नोकऱया उपलब्ध होणार आहे. जे गोमंतकीय युवक परराज्यात व परदेशात आयटी क्षेत्रात काम करत आहे त्यांना गोव्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे कसलीच पर्यावरणाची हानी होणार नाही त्याचप्रमाणे हा प्रकल्प हा पूर्णपणे लोकांना rविश्वासात घेऊन होत आहे. एप्रिल पर्यत या दोन्ही प्रकल्पांचा कामाला सुरुवात होणार आहे. चिंबल प्रकल्प 12 एकर तर पर्वरीचा 3 एकर जागेत असणार आहे. देशातील इतर आयटी प्रकल्पाच्या तुलनेत हे प्रकल्प खूपच लहान आहे. पण रोजगार निर्मिती मात्र मोटय़ा प्रमाणात केली जाणार आहे असे खवटे म्हणाले.

सगळय़ांना विश्वासात घेऊनच आयटी प्रकल्प

 चिंबल ग्रामपंचायत तसेच लोकांनी याला पाठींबा दिला आहे त्याचप्रमाणे अन्य काही आमदार मंत्री असे प्रकल्प आपल्या मतदार संघात आणण्यास इच्छूक आहे. कारण आताच्या आधुनिक युगात जगण्यासाठी आयटी प्रकल्पाची खूप गरज आहे. पण काही लोक या विषयीचा अभ्यास न करता याला विरोध करत आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काहीजण याला विरोध करत आहे. पण सगळय़ांचा सहमतीने हा आयटी प्रकल्प होत आहे. सगळय़ांना विश्वासात घेऊन या विषयी श्वेत पत्रिकाही जारी केली आहे. हा सर्व व्यवहार पारदर्शक आहे. त्यामुळे याला कोणीही विरोध करु नये, असेही यावेळी मंत्री खवटे यांनी सांगितले.