|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकोत्सवातून लोकसंस्कृतीचे संवर्धन

लोकोत्सवातून लोकसंस्कृतीचे संवर्धन 

प्रतिनिधी/ पणजी

आमच्या पूर्वजांनी सुखमय जीवन जगण्यासाठी लोकनृत्य, लोकगीत, लोकसंगीत कलेची जोपासना केली होती. त्यांनी जोपासलेली ही संस्कृती, कला एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जाणे गरजेचे असून हे कार्य लोकोत्सवामाफ्&ढत होत आहे, असे उद्गार कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काढले.

यंदाच्या 20 व्या ‘लोकोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी काल शुक्रवारी मंत्री बोलत होते. यावेळी कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, उपसंचालक अशोक परब, खात्याचे सचिव दौलत हवालदार, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुरचे निर्देशक फुरकान खान, नाबार्डच्या महाव्यवस्थापक कामाक्षी पै आणि जंबू हसमनी यांची उपस्थिती होती. तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचीही खास उपस्थिती होती. गोवा कला व संस्कृती संचालनालय आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपुर यांच्या संयुक्त विद्यमाने हा लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

देशातील 15 राज्यांचा सहभाग

 देशातील 15 राज्यांनी लोकोत्सवात भाग घेतला असून त्यात 7 नवीन राज्यांचा समावेश आहे. तसेच 43 पथकांची निवड झाली असून सलग दहा दिवस त्यांचे सादरीकरण होणार आहे. गोमंतकीय कलाकारांचाही यामध्ये सहभाग आहे. ग्रामीण भागातील लोकांनी संस्कृती जोपासली असून लोककाकारांचा सन्मान हा झालाच पाहिजे म्हणून त्यांना लोकोत्सवात सादरीकरण करण्याची संधी देण्यात आल्याचेही मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

 लोकोत्सवात हस्तकला केंद्रबिंदू

दौलत हवालदार यांनी सांगितले की, यंदाच्या लोकोत्सवात हस्तकला काम करणाऱयांना केंद्र स्थानी ठेवण्यात आले आहे. पुर्वी हातातून करण्यात येणारी कामे आज मशिनमध्ये होतात. आपला निसर्गाकडे असलेला संपर्क कुठेतरी तुटायला सुरुवात झाली आहे. अशा कार्यक्रमातून पर्यटकही अधिक येतात.

फुरकान खान म्हणाले की, भारतात अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गोवा राज्य सक्रीय आहे. लोकोत्सवात अनेक दालने असून त्याचा लाभ गोमंतकीयांनी घ्यावा, असेही ते म्हणाले. संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी स्वागत केले तर उपसंचालक अशोक परब यांनी आभारप्रकटन केले.

विविध राज्यातील लोककलांचा आविष्कार

लोकोत्सवाच्या उद्घाटनानंतर विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. श्री कटमगाळ दादा पंगड फ्ढाsंडा यांनी शिमगोत्सव, ओम शिव शंभो संगीत विद्यालय मेरशी यांनी मुख वंदन, राजस्थानी कलाकारांनी माग्नीयार, रंगमेळ गोठण वेलिंग म्हार्दोळ यांनी जागोर, ओडीशा येथील कलाकारांनी गोतीपुवा, सेंट सेबेस्टेन महिला मंडळ कल्चरल ट्रूप केन्याभाट केपे यांनी कुणबी नृत्य, आसाम येथील कलाकारांनी बीहू, महाराष्ट्र कलाकारांनी पोवाडा, गिरीश कला केंद्र सावर्डे यांनी वीरभद्र नृत्य, मणिपूर कलाकारांनी पुंग ढोल चोलाम आणि थांगटा, राजस्थान येथील कलाकारांनी भवाई, लेह लडाख येथील कलाकारांनी जबारो आणि मास्क नृत्य, हरियाणातील कलाकारांनी घुमर आणि गुजरात येथील कलाकारांनी मेवासाई नृत्य सादर केले.