|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा-अनमोड-बेळगाव महामार्ग वाहतुकीस बंद

गोवा-अनमोड-बेळगाव महामार्ग वाहतुकीस बंद 

मे महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ फोंडा

गोव्याची लाईफलाईन ठरलेला महामार्ग एनएच 4 अ गोवा-अनमोड-बेळगाव महामार्ग काल  शुक्रवार 11 रोजी पासून संपुर्णरित्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनमोड घाट ते रामनगरपर्यत सुमारे 34 कि.मी. महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्याला सहा महिन्याचा अवधी लागणार आहे.

 गोव्यातून बेळगावला प्रवास करणाऱयांना आता साखळीमार्गे चोर्ला घाटातून बेळगाव किंवा कारवार गाठावे लागणार आहे. मे अखेरपर्यत रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

गोवा हद्द ते अनमोड गेटपर्यतचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटदाराकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गोव्याहून बेळगाव जाणाऱया वाहनांसाठी साखळी येथील चोर्लाघाटमार्गे बेळगाव गाठावे लागणार आहे. तसेच काणकोण – कारवार महामार्गावर अवलंबून रहावे लागणार आहे. या वळविण्यात आलेल्या वाहतुकीमुळे चोर्लाघाटमार्गावर ताण पडणार आहे.