|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » 8 प्राथमिक शाळांना 60 लाखाचा निधी

8 प्राथमिक शाळांना 60 लाखाचा निधी 

वार्ताहर/   चिकोडी

2018-19 सालात 8 प्राथमिक शाळांना 60 लाख 6 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 9 शाळांच्या दुरुस्तीला मान्यता दिली आहे. प्राथमिक 4 शाळांना 12 खोल्या तर माध्यमिक 2 शाळांना 6 खोल्या मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीपती भट्ट यांनी दिली. चिकोडी तालुका पंचायतीच्या द्विमासिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विविध विषयावर विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱयांनी सविस्तर उत्तरे दिली. यामुळे ही सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ता. पं. अध्यक्षा उर्मिला पाटील होत्या.

प्रारंभी समाज कल्याण खात्याच्या अधिकारी शशिकला सवदी मूलभूत सेवा-सुविधांची माहिती देताना म्हणाल्या, कायदा विद्यार्थ्यांना शासनाकडून 12 लाख रुपये निधी मिळाला असून यापैकी 6 लाख 20 हजार रुपये वितरण केले आहेत. याशिवाय समाज कल्याण विभागात कोणतीही समस्या नसल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे म्हणाले, 93 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले असून क्षयरोगाचे 2 व कुष्ठरोगाचा 1 रुग्ण आढळला आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात 7 हजार 180 महिलांची प्रसुती करण्यात आली असून त्यांच्यासाठी येणाऱया शासनाच्या प्रोत्साहन निधीपैकी सुमारे 25 लाख रुपये वितरण करण्यात आले आहेत. चिकोडी तालुक्यात चिकुनगुण्या व एचवन-एनवनमुळे दोघेजण दगावले आहेत. त्याठिकाणी रोगप्रतिबंधक काळजी घेण्यात आल्याचे सांगितले.

सूचनापत्रासाठी पैशांची मागणी

यावेळी ता. पं. सदस्य रवी मिरजे म्हणाले, कल्लोळ येथील एका नवजात बाळाला उपचारासाठी बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यासाठी सरकारी वैद्याधिकाऱयांचे सूचनापत्र गरजेचे असताना तीन दिवस उशिराने रेफरन्स देण्यात आला. त्याच्या पालकाकडून 60 हजार रुपयाची मागणी केली. त्यामुळे सदर बालक मृत पावले. त्या बाळाच्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार आहात असा आरोप त्यांनी केला. यावर बाळाच्या नातेवाईकांना शासनाकडून 1 लाख 20 हजार रुपये मंजूर झाल्याचे अधिकारी शिंदे यांनी सांगितले.

तालुका इस्पितळाला स्त्राrरोग तज्ञाची गरज

यावेळी मिरजे म्हणाले, चिकोडी जिल्हय़ाकडे वाटचाल करीत असताना तालुका इस्पितळाला स्त्राrरोग तज्ञाची गरज आहे. पण ते पद का भरत नाही. त्यासाठी ताबडतोब स्त्राrरोग तज्ञाची नेमणूक करावी, असे सांगून सरकारी व खासगी डॉक्टरांचे संगनमताने सर्वांची लूट चालू असल्याचा आरोप केला.

विद्यार्थ्यांना एक जोड कपडे आले असून अद्याप दुसरे जोड येणे बाकी आहे. 98 टक्के सायकली दिल्या असून 18 विद्यार्थिंनींना सायकल देणे बाकी आहे. 2018-19 सालात 8 प्राथमिक शाळांना 60 लाख 6 हजार रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 9 शाळांच्या दुरुस्तीला मान्यता दिली आहे. प्राथमिक 4 शाळांना 12 खोल्या तर माध्यमिक 2 शाळांना 6 खोल्या मंजूर करण्यात आल्या असून दहावीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीला 4778 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून टक्केवारी वाढविण्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना 60 टक्के शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. नणदी येथे मजुरांसाठी साखर शाळेची निर्मिती करण्यात आली असून त्याठिकाणी 104 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्षा महादेवी नाईक, कार्यनिर्वाहक अधिकारी के. एस. पाटील, हेस्कॉमचे बी. व्ही. पुजारी यांच्यासह ता. पं. सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.