|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » नौशेरात लष्करावर हल्ला, मेजरसह २ जवान शहीद

नौशेरात लष्करावर हल्ला, मेजरसह २ जवान शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

नियंत्रण रेषा (एलओसी) जवळील राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दहशतवाद्यांनी हल्ल्यात आयईईडीचा स्फोट केल्याने यात दोन जवानांना वीर मरण आले. 

राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळील पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका मेजरसह दोन जवान गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु. उपचार सुरू असताना या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला. आयईईडी स्फोटांच्या मदतीने दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, असे एका लष्करातील अधिकाऱ्याने सांगितले. याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली व त्यानंतर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. 

Related posts: