|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कवी वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार जाहीर

कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कवी वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार जाहीर 

ऑनलाईन टीम / पुणे :

आवनओल प्रतिष्ठान कणकवलीतर्फे देण्यात येणाऱया 2018 च्या कवी वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कारासाठी नांदेड येथील कवयित्री सुचिता खल्लाळ यांच्या शब्दालय प्रकाशनाने (श्रीरामपूर) प्रकाशित केलेल्या ‘प्रलयानंतरची तळटीप’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.

पाच पाच हजार रूपये स्मृतिचिन्ह आणि शाल असे असे पुरस्काराचे स्वरूप असून 26 जानेवारी रोजी कणकवली येथे होणाऱया आवानओल प्रतिष्ठानच्या 9 व्या उगवाई काव्योत्सवात सुचिता खल्लाळ यांना कवी वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे ! आवानओल प्रतिष्ठानतर्फे मागील नऊ वर्ष कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितेची चळवळ राबवली जाते. या चळवळीतर्फे वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्कार मराठीतील मागील दोन वर्षातील एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला दिला जातो. यापूर्वी या पुरस्काराने कवी एकनाथ पाटील, शरयू आसोलकर, अभय दाणी, विनोद कुमरे, श्रीधर नांदेडकर, सुजाता महाजन, सुशीलकुमार शिंदे आदी कवीना गौरविण्यात आले असून 2018 च्या सदर पुरस्कारासाठी खल्लाळ यांच्या समग्र माणूसपणाला भिडणाऱया ’प्रलयानंतरची तळटीप’ या काव्यसंग्रहाची संस्थेतर्फे निवड करण्यात आली. सुचिता खल्लाळ या नांदेड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असून मराठीतील महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर नव्या पिढीतील एक समीक्षक म्हणूनही त्याने नावलौकिकता प्राप्त केले आहे.