|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात गँगवॉरमुळे भर रस्त्यात एकाची हत्या

नागपुरात गँगवॉरमुळे भर रस्त्यात एकाची हत्या 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूरात पुन्हा एकदा गँगवॉरमुळे भर रस्त्यावर हत्येची घटना घडली आहे. कालरात्री 11 वाजेच्या सुमारास गौरव उर्फ पंडय़ा पिल्लेवान या गुन्हेगाराची इतर काही गुन्हेगारांनी तीक्ष हत्याराने भोसकून हत्या केली. ही घटना नागपुरातील कमाल चौकात घडली.

गौरव पिल्लेवानने 2016 मध्ये याच कमाल चौक परिसरात एका तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर तो तुरुंगात होता. नुकतंच तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर गौरव ने ज्या तरुणाची हत्या केली होती त्याच्या कुटुंबीयांच्या मागणीमुळे गौरवला परिसरात प्रवेश बंदी केली होती. मात्र, तरीही गौरव पाचपावली परिसरात राजरोसपणे फिरत होता. याचाच फायदा घेत काल रात्री तो शनीचरा बाजारात उभा असताना तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव पिल्लेवानच्या हत्या प्रकरणी योगेश धनविजय या आरोपीला अटक केली आहे. तर इतर हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरात भर रस्त्यांवर हत्येचे सत्र सुरुच आहे.