|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र सुरूच

साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र सुरूच 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

यवतमाळमधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसऱया दिवशीही सुरूच आहे. आज दुसऱया दिवशी कलाकारांनी काळय़ा फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला आहे. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्या प्रकरणी पहिल्या दिवशी अध्यक्ष अरूणा ढेरे आणि मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती टीका केली.

संमेलनात आज ग.दी.माडगुळकरांच्या साहित्य संपदेचा आढावा घेणाऱया संगीतमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय वाटवे, गौरी देशपांडे , अपर्णा केळकर, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी सहभागी झाल्या होत्या. या चारही सहभागी कलाकारांनी काळय़ा फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला. काळय़ा फिती लावून गदिमांच्या कवितांचे या कलाकारांनी वाचन केले. यासोबतच याप्रकरणी मुंबईच्या ‘मुक्त शब्द मासिक’ आणि ’शब्द प्रकाशना’ने निषेध आणि बहिष्काराचे फलक 73 क्रमांकाच्या स्टॉलमध्ये लावले आहे.