|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » ठाकरे चित्रपटातील ‘ आया रे सबका बापरे…’गाणं प्रदर्शित

ठाकरे चित्रपटातील ‘ आया रे सबका बापरे…’गाणं प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा दिमाखात मुबंईत पार पडला आहे. ठाकरे सिनेमातील गाणी यावेळी प्रदर्शित करण्यात आसून या सोहळय़ाला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, निर्माते आणि खासदार संजय राऊत आणि खुद्द उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.

‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे…’ हे हिंदी गाणं यावेळी प्रदर्शित करण्यात आलं. अवघ्या काही मिनिटातच या गाण्याला यूट्युबवर लोकांची पसंती मिळत आहे. हे गाणे नकाश अजीजने गायले.

गाण्याच्या मेकिंगचा अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला थोडे भान ठेवावे लागते, अन्यथा मला ऐकवलेल्या गाण्यावर ठेका धरावसा वाटला होता. ठाकरे हिंदी चित्रपट सेन्सॉरमधून सुटला आहे. थोडी आम्हीही धार लावली, पण सुटला. उद्या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे. हा चित्रपट पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि कार्निव्हल मोशन पिक्सर्च निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून मराठी भाषेसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांनी आवाज दिला आहे. तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.