|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » आणखी दोन दिवस मुंबईकरांचे हाल ; संप लांबण्याची शक्यता

आणखी दोन दिवस मुंबईकरांचे हाल ; संप लांबण्याची शक्यता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्ट कर्मचाऱयांचा संप आता आणखी दोन दिवस लांबण्याची शक्मयता आहे. आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान महापालिका – बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजू उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतल्या. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत. मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. त्यानंतर उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहे. या कोर्टात मांडलेल्या अहवालावर कोर्ट काय निर्णय देईल यावर बेस्ट संपाचे भवितव्य अवलंबून असणार आहे..

बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्या

– बेस्टचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या ‘अ’अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.

– 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱयांची 7,390 रु. सुरु होणाऱया मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी.

– एप्रिल 16 पासून लागू होणाऱया नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे.

– 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱयांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱयांना बोनस.

– कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा.

– अनुकंपा भरती तातडीने सुरु करावी.