|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » कोडगु उत्सवास सुरूवात

कोडगु उत्सवास सुरूवात 

ऑनलाईन टीम /कोडगु :

अतिवृष्टीमुळे कोडगु येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. तेथे प्रवाशांना पुन्हा आकर्षीत करण्यासाठी ‘कोडगु उत्सव’ 11 ते 13 जानेवारी पर्यंत भरविण्यात येत आहे. या उत्सवाचे उद्घाटन येथील गांधी मैदानात शुक्रवार  11 रोजी सायंकाळी 4.30 वा. कोडगु जिल्हा पालकमंत्री व प्रवासोद्यम मंत्री सा. रा. महेश यांच्या हस्ते करण्यात आले. या उत्सवाला बागायत खाते, पशुखाते व विविध संघ संस्थांतर्फे सहाय्य करण्यात आले आहे.

या उत्सवात फल-पुष्प प्रदर्शन, येथील कुलदेवता कावेरीमाता, मंदिर यांच्या प्रतिमा आकर्षक पुलांनी तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुलांना आकर्षीत करण्यासाठी डोनाल्डडक, मिकीमाऊस, स्पाईडरमॅन आदींच्या प्रतिमा देखिल फुलांनी व पानांनी साकारण्यात आल्या आहेत. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखिल सादर करण्यात येत आहेत. सकाळी 10 पासुन रात्री 10 वा. पर्यंत नागरिक येथे भेट देऊ शकतात. आजपर्यंत बहुसंख्य नागरिकांनी येथे भेटी दिल्या आहेत.