|Sunday, June 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

मकरेत सूर्य प्रवेश, बुध, शनि युती होत आहे. रविवार, सोमवार सर्वच ठिकाणी अडचणी येऊ शकतात. घरात वाद वाढू शकतो. डोके शांत ठेवा. राजकीय- सामाजिक कार्यात निष्फळ ठरलेले डावपेच नव्याने प्रभावित करता येतील. प्रयत्न सोडू नका. जवळच्या लोकांना विश्वासात घ्या. घरातील व्यक्तींना नाराज करू नका. धंद्यात सुधारणा करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. वाट पहा. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवून अभ्यास करावा.


वृषभ

मकरेत सूर्याचे राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. संक्रांत विरोधकांच्या वर उलटवता येईल. शांत डोक्याने व प्रेमाने शत्रूला सरळ करा. राजकीय-सामाजिक कार्यात चुका सुधारून प्रगतीचा मार्ग घेता येईल. लोकांना खूष करण्यासाठी योजना बनवता येईल. घरातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. मंगळवार, बुधवारी धंद्यात अडचण येऊ शकते. सावधपणे निर्णय घ्या. कोर्टकेसमध्ये चिंता कमी होईल. मुलांनी अभ्यासाचे प्रयत्न  करावेत तरच मोठे व्हाल.


मिथुन

मकरेत सूर्याचे राश्यांतर, बुध, शनि युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात गुरुवार, शुक्रवारी तणाव होऊ शकतो. अपमानास्पद घटना घडू शकते. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंदा मिळवता येईल. व्यावहारिक करार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील व्यक्तीच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.  जीवनसाथीबरोबर  वाद होऊ शकतो.


कर्क

कर्केच्या सप्तमस्थानात सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. अडचणीत आलेली कामे पूर्ण करण्याचा उत्साह राहील. नोकरीतील ताण कमी होईल. राजकीय- सामाजिक कार्यास नवे डावपेच टाकता येतील. दर्जेदार लोकांचा परिचय होईल. संसारातील समस्या सोडवता येईल. शनिवारी किरकोळ वाद होऊ शकतो. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती करता येईल. आळस करू नका. घर, जमीन, वाहन, खरेदी करता येईल. शेतकरी वर्गाला अंदाज घेता येईल. बोलणे नीट ठेवा.


सिंह

मकरेत सूर्याचे राश्यांतर, बुध, शनि युती होत आहे. सोमवार, मंगळवारी, राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे येतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. प्रवासात सावध रहा. धंद्यात चांगले काम मिळवण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून तुमच्या मनातील गुपित काढण्याचा प्रयत्न होईल. घरातील स्वत:ची समस्या सोडवणे कठीण होऊ शकते. मन उदास राहील. शेतकरी वर्गाने पैसे अनाठायी खर्च करू नये. कला, क्रीडा, शिक्षणात तुमचे कौतुक होईल. यशासाठी कष्ट घ्याल.


कन्या

मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात प्रगतीची नवीन संधी मिळेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकांना खूष करता येईल. सोमवार, मंगळवार वाद व मतभेद होतील. घरगुती कामे होतील. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल. कला, क्रीडा, शिक्षण मनाप्रमाणे यश मिळेल. तुमचे कौतुक होईल. मोठे लोक मदत करतील. शेतकरी वर्गाला नवा पर्याय मिळेल. फायदा होईल.


तुळ

मकरेत सूर्याचे राश्यांतर, बुध, नेपच्युन लाभयोग होत आहे. या सप्ताहात विलंबाने राजकीय, सामाजिक कामे होतील. अडचणी येतील. विरोधक ताण तणाव करतील. संयमाने वागा, प्रश्न वाढणार नाही. धंद्यात काम मिळेल. हिशोब नीट करा. तुमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न होईल. घरात कामे वाढतील. वेळ अपुरा पडेल. कला, क्रीडा शिक्षणात कष्ट घ्या. मोठय़ा माणसांच्याबरोबर नम्रपणे बोला.  शेतकरी वर्गाचा निर्णय घेताना गोंधळ होईल. मंगळवार, बुधवार मन स्थिर राहील.


वृश्चिक

मकरेत सूर्याचे राश्यांतर, चंद्र, शुक्र प्रतियुती धंद्यात फायदा वाढेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. मोठे कंत्राट मिळवा. गुंतवणूक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. मंगळवार, बुधवार तणाव होईल. किरकोळ तणाव वाढवू नका. शुभ समाचार घरात, नोकरीत मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगतीचा मार्ग मिळेल. नवीन परिचय होईल. उत्साह वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. वास्तू, जमीन खरेदी, विक्रीत फायदा होईल.


धनु

मकरेत सूर्य प्रवेश, बुध, शनि युती होत आहे. गुरुवार, शुक्रवारी खर्च वाढेल. दगदग जास्त होईल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. धंदा वाढेल. कामगारांना सांभाळून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात थोरा मोठय़ांचा विचार उपयोगी पडेल. प्रति÷ा वाढेल. गुप्त कारवायांना थोपवता येईल. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात आळस करू नका.  खाण्याची काळजी घ्या. महत्त्वाची वस्तू सांभाळा.


मकर

तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. या सप्ताहात तुमचा उत्साह व आत्मविश्वास  वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे धोरण नव्याने बनवा. प्रतिमा उजळेल. लोकांच्या समस्येवर उपाय शोधा. धंद्यात ओळख व माहिती नसतांना पैसे गुंतवू नका. घरात आनंदी वातावरण राहील. विवाह इच्छुकांनी लग्नासाठी प्रयत्न करावेत. कला, क्रीडा, शिक्षणात चांगले यश मिळेल. शेतकऱयाला दिशा मिळेल. पैसा जपून वापरा. कोर्टाच्या कामात प्रगती होईल.


कुंभ

मकर राशीत सूर्य प्रवेश, बुध, नेपच्यून लाभयोग होत आहे.  या सप्ताहात अडचणी आल्या तरी जिद्दीने तुमची कामे करून घेता येतील. धंद्यात आताच मोठे काम मिळवा. ओळखीचा फायदा होईल. नोकरीत कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक  कार्यात तुमच्यावर भलताच आरोप होईल. वरि÷ांच्या बरोबर मतभेद होतील. सहनशीलता ठेवा. डोळय़ांची काळजी घ्या. खर्च वाढेल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात मागे राहू नका. प्रसिद्धी कमी मिळेल.


मीन

या सप्ताहात न होणारी कामे करून घेता येतील. अडचणी कमी होतील. संयम ठेवा. वाहन जपून चालवा. मकर राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. धंद्यात प्रगती होईल. नवी दिशा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. थकबाकी वसूल करता येईल. जनहितासाठी मोठे कार्य हातून होईल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. शिक्षणात उच्च यश मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदी, विक्रीत फायदा होईल.