|Saturday, May 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एअर इंडियाच्या प्रवासी संख्येत वाढ

एअर इंडियाच्या प्रवासी संख्येत वाढ 

मागील तिमाहीत नफ्यात 20 टक्क्यांची भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑक्टोबर-डिसेंबर 2018 या तिमाहीत एअर इंडियाच्या प्रवाशांच्या संख्येत वार्षिक आधारावर केवळ 4 टक्क्यांची वृद्धी झाली असली तरीही प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न 20 टक्क्यांनी वाढून 5538 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 2017 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत हा आकडा 4615 कोटी रुपये राहिला होता. विमानांचा चांगला तसेच प्रभावी वापर करण्यात आल्याने उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती अधिकाऱयाने दिली.

डिसेंबरमध्ये प्रवासी संख्येतील वाढ अधिक राहिली नसली तरीही ‘अव्हेलेबल सीट किलोमीटर’मध्ये (एएसकेएम) मध्ये चांगली वृद्धी नोंदली गेली आहे. एएसकेएमच्या माध्यमातून कोणत्याही विमानाची प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता समजते.

केवळ डिसेंबर महिन्यातच एअर इंडियाच्या प्रवाशांची संख्या 4 टक्क्यांनी वाढली असून उत्पन्नात 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. एअर इंडियाच्या एकूण उत्पन्नाचा 65 टक्के भाग आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानसेवेतून प्राप्त होतो.

48 हजार कोटींचे कर्ज

डिसेंबर तिमाहीत एअर इंडियाने 15 नवी उड्डाणे सुरू केली. याच्या ताफ्यात सध्या 122 विमानांचा समावेश आहे. आर्थिक संकटाला तोंड देणाऱया एअर इंडियावर 48 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मे महिन्यात सरकारने एअर इंडियाची हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खरेदीदार मिळू शकला नव्हता.

Related posts: