|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नटवर सिंग यांच्या पुत्राची जीभ घसरली

नटवर सिंग यांच्या पुत्राची जीभ घसरली 

अलवर

 माजी विदेश मंत्री नटवर सिंग यांचे पुत्र तसेच बसप नेते जगत सिंग एका विधानामुळे वादात सापडले आहेत. जगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. रामगढ विधानसभा मतदारसंघातील बसपचे उमेदवार असलेल्या सिंग यांनी आपण दगडाला एके-47 ने प्रत्युत्तर देत असल्याचे म्हटले आहे. मोदी, गेहलोत तसेच राजे यांचे नाव घेत जगत यांनी सर्वांना ‘पेटी पॅक’ करून पाठविणार असल्याचे विधान केले आहे. जगत यांच्या वादग्रस्त विधानाची चित्रफित समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होत आहे. रामगढ मतदारसंघात बसपचे यापूर्वीचे उमेदवार लक्ष्मण सिंग यांच्या मृत्युमुळे निवडणूक स्थगित करण्यात आली होती. येथे 28 जानेवारी रोजी मतदान तर 31 रोजी मतमोजणी होणार आहे.

जगत यांच्या वादग्रस्त विधानाची चित्रफित समोर आल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर समाजमाध्यमांवर या विधानाबद्दल टीकेचा सूर उमटत आहे.