|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वाराणसीला विशेष दर्जा देण्याची आप नेत्याची इच्छा

वाराणसीला विशेष दर्जा देण्याची आप नेत्याची इच्छा 

वाराणसी

 आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी वाराणसीला ‘विशेष वारसा नगर’ घोषित करण्याची मागणी केली आहे. सिंग यांनी राज्यसभेत खासगी विधेयक सादर करण्यासाठी राज्यसभा सचिवालयाला प्रस्ताव सोपविला आहे. उत्तरप्रदेशच्या वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या नावाखाली मंदिरे हटविण्याच्या कार्याला त्यांनी विरोध दर्शविला आहे. ‘आप’चे उत्तरप्रदेशचे प्रभारी संजय सिंग यांनी वाराणसी तसेच अयोध्येत मंदिरे हटविण्याच्या विरोधात शनिवारी अयोध्येपासून वाराणसीपर्यंतचा दोन दिवसीय दौरा सुरू केला आहे. वाराणसीत प्रस्तावित 700 मीटर लांबीच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीदरम्यान आतापर्यंत 36 मंदिरे हटविण्यात आली आहेत. अयोध्ये देखील 176 मंदिरे हटविण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रस्तावित विधेयकाचा उद्देश प्राचीन नगरी काशीला विशेष वारसा तसेच राष्ट्रीय महत्त्वाचे शहर घोषित करणे तसेच हटविण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्स्थापना करणे असल्याचा दावा सिंग यांनी केला.