|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गावठाणवाडी येथे गव्याकडून ऊसपिकाचे नुकसान

गावठाणवाडी येथे गव्याकडून ऊसपिकाचे नुकसान 

वार्ताहर/ आडोली

   गावठाणवाडी (ता. राधानगरी) येथील सुरेश लगड, अवधूत ढेकरे, तानाजी ढोकरे यांच्या शेतातील ऊसपिकाचे गव्यांनी मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. दुसरीकडे वनविभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.

   राधानगरी तालुक्यात अतिशय दुर्गम असा वाकिघोल खोरा आहे. त्यामुळे गव्यांचा वावर व पैदास मोठय़ा प्रमाणात होते. पावसाळ्यात मुबलक चारा जंगलात मिळत असलेने त्या दिवसात गवे शिवारात आढळत नाहीत. पण सध्या जंगलात चाराटंचाई असलेने हे गवे थेट शिवारात येत आहेत. व ऊस पिक फस्त करुन टाकत आहेत.

  वनविभागाकडून पंचनामे करुन तुटपुंजी रक्कम शेतकऱयांच्या खात्यावर वर्ग करणेचा कार्यक्रम राबविला जातो. परंतु दिवसरात्र कष्ट करुन हातातोंडाशी आलेले ऊसपिक गव्याकडून फस्त केलेने निराश बनलेला शेतकरी मात्र चिंतातूर बनला आहे.