|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सहानभुतीपेक्षा आजी-माजी सैनिकांना पाठबळ देणार

सहानभुतीपेक्षा आजी-माजी सैनिकांना पाठबळ देणार 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

देशाच्या सिमेवर असो किंवा अंतर्गत कोणत्याही आपत्ती असो सर्व प्रथम आधार म्हणून जवानाकडे पाहिले जाते. त्यासाठी त्यांना आजीवन सन्मान दिला तर पाहिजे त्याचबरोबर त्यांच्या कुटूंबियाच्या प्रत्येक सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. रक्षण करणाऱया प्रत्येक सैनिक हा भारतीयांचा आत्मा असून त्या जवानाला सहानभुतीपेक्षा पाठबळाची खरी गरज आहे. असे पाठबळ शाहू ग्रुप देणार असल्याचे प्रतिपादन पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथील सुर्या सांस्कृतिक हॉलमध्ये शनिवारी राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या विद्यमाने माजी सैनिक मेळावा व वीरपत्नी, वीरमाता, पिता यांच्या सत्कार सोहळय़ात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजमाता जिजाउ महिला समितीच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे होत्या. सुरवातीस स्वागत गीत झाले. प्रास्ताविकात कर्नल शिवाजी बाबर यांनी मेळावा घेण्यामागील हेतू स्पष्ट केला.

आपल्या मनोगतात बोलताना श्री घाटगे पुढे म्हणाले, शाहू ग्रुपच्या स्थापनेपासून आज पर्यंत आर्मीची शिस्त असल्याने शाहूचा विचार घरोघरी पोहचला आहे. शाहूच्या घरात आर्मीचे संस्कार असल्याने त्यांच्याबद्दल आजही मोठा आदर केला जात असल्याने त्यांच्या प्रत्येक सुख-दुखात शाहू ग्रुप सहभाग असतो. राजे फौडेंशनच्या वतीने आजी-माजी सैनिकांना वैद्यकीय सेवा देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. परिसरात पॅन्सरग्रस्त महिलांची मोठी संख्या असल्याने आता अशा महिलांच्यावर सर्जिकल स्ट्राईक पध्दतीने उपचार करणार असल्याचेही यावेळी सांगितले. कारण महिला कुटूंबियांची काळजी करतात पण त्यांची काळजी फार कोण घेत नसल्याने राजे फौंडेशनच्या पुढाकाराने आजी-माजी सैनिकांच्या कुटूंबाची काळजी घेणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर महिला सबलीकरण म्हणून नवीन उद्योग सुरू करणार असून त्यामध्ये विर पत्नी-मातांचा सहभाग करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या वतीने ‘जय जवान कर्ज योजना’ योजनेतंर्गत सवलतीच्या दरात कर्ज योजना सुरू करणार असून आजी-माजी सैनिकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केला. अध्यक्षीय मनोगत सुहासिनीदेवी घाटगे यांनी व्यक्त केले. यावेळी कर्नल सावंत, बाळासो पोवार, सरपंच प्रविण माळी, प्रदीप आडावकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे जितेंद चव्हाण, कर्नल सावंत, कर्नल इंगळे, जिल्हा परिषद सदस्या अनिता चौगुले, शकुंतला हळदकर, व्ही. ए. देसाई, सदाशिव घेवडे, ए. ए. सावंत, अमरसिंह घोरपडे, डी. ए. मंडलिक, सतिश हळदकर, तुषार यमगेकर यांच्यासह आजी-माजी सैनिक, वीरमाता, पत्नी, पिता उपस्थित होते. सुत्रसंचलन राजेंद्र मानमुले यांनी केले. तर कॅप्टन तिप्पे यांनी आभार मानले.