|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अमित शहा, मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही

अमित शहा, मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला ही काय मोगलाई नाही. वेळ पडल्यास ’इट का जवाब पथ्थर से’ देऊ असा प्रति इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींना दिला. साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नसल्याची टिकाही खोत यांनी पेली.  कोल्हापूर येथील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

  उसाच्या दरासंदर्भात खोत यांना विचारले असता त्यांनी शेट्टींवरच निशाणा साधला. ते म्हणाले, शेट्टी यांनी अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. थकीत ऊस बिलावरून निघालेल्या कोल्हापूरातील मोर्चात खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री दिसतील तिथे अडवण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही लक्ष केले जात आहे. मात्र हा सर्व खटाटोप ब्रेकिंग न्यूजपुरताच मर्यादीत आहे. राज्यात मोगलाई नाही लोकशाहीचे राज्य आहे. असा टिका त्यांनी केली.

Related posts: