|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेळकेवाडी येथे अपघातात दोन ठार

शेळकेवाडी येथे अपघातात दोन ठार 

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ

मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे अज्ञात चारचाकी वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघेजण ठार झाले. अतुल अशोक सरगर (वय 21), ऋषिकेश विजय पोतदार (वय 22, दोघेही वरचे गल्ली,तासगाव) हे ठार झाले. शुक्रवारी (ता.11) मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला.अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती, तासगाव येथील अतुल सरगर व ऋषिकेश पोतदार हे दोघेजण नागजहून शिरढोणकडे मोटारसायकल क्रमांक एमएच 10 बीव्ही 4903 वरून निघाले होते. राज्यमार्गावरील शेळकेवाडी येथे आले असता शुक्रवारी (ता.11) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. दिलेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी होऊन ठार झाले आहे. फिर्याद किरण किसन पाखरे यांनी दिली आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहेत.