|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत जाळय़ात सापडली मगर

सावंतवाडीत जाळय़ात सापडली मगर 

प्रतिनिधी/ सावंतवाडी

येथील मोती तलावात गेली काही वर्षे मगरीचे दर्शन झाले नव्हते. मात्र,
शुक्रवारी मासे पकडणाऱयांच्या जाळय़ात अडीज फुटी मगर सापडली. कामगारांनी ती बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात दिली. वनविभागाने तिला नैसर्गिक अधिवासात सोडले. मगर सापडल्याने तळय़ात मगरी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोती तलावात प्रथम 2005 मध्ये मगरीचे दर्शन झाले होते. तलावात बसविलेल्या कारंज्यावर ही मगर दिसत होती. वनविभागाने ती मगर पकडली. त्यानंतरही मगरीचे दर्शन होत होते. परंतु या मगरी छोटय़ा होत्या. पालिकेने पाणी आटवून मगरींना पकडले होते. अलिकडच्या तीन वर्षात मगरीचे दर्शन होत नव्हते. परंतु आता तलावातील मासे पकडण्याचा ठेके घेतलेल्या परवेझ शेख यांच्या कामगारांना मासे पकडताना जाळय़ात मगर सापडली. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी तळय़ाकाठी गर्दी केली होती. कामगारांनी मगरीला तळय़ाकाठी आणून वनविभागाच्या ताब्यात दिली. वनपाल सी. व्ही. धुरी, कर्मचारी ज्ञानेश्वर गावकर, आनंद कुऱहाडे, बबन रेडकर, काकतीकर यांनी तिला ताब्यात घेतले. यावेळी नगरपालिका कर्मचारी भाऊ भिसे उपस्थित होते.

जाळय़ात सापडताच मगर सुस्त

एरव्ही आक्रमक असणारी मगर जाळय़ात सापडल्यानंतर शांत झाली. तिने तळय़ाकाठी येईपर्यंत कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे कामगारांना ती मृत पावली असावी, अशी शंका आली. ते मगर मृत झाल्याचे सांगत होते. तळय़ाकाठी आल्यानंतर ब्लेडने जाळे तोडण्यात आले. त्यानंतर अचानक मगरीने तोंड उघडले