|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बोकमूर येथे उसाच्या फडाला आग लागून लाखाचे नुकसान

बोकमूर येथे उसाच्या फडाला आग लागून लाखाचे नुकसान 

वार्ताहर /उचगाव

कल्लेहोळ येथील शेतकरी तुकाराम लक्ष्मण मुतकेकर यांच्या बोकमूर शेतवडीमध्ये असलेल्या शेतीतील उसाच्या मळय़ाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

या घटनेची अधिक माहिती अशी की, तुकाराम मुतकेकर यांची बोकमूर येथे गावाजवळ शेती असून याठिकाणी त्यांचा उसाचा मळा आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून उसाची तोडणीही सुरू झालेली होती. याच शेतामध्ये उसाच्या मळय़ाला लागून विद्युतभारित ट्रान्स्फॉर्मर आहे. या ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या पडून ही आग लागली. यामध्ये संपूर्ण ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.

सदर घटनेचा पंचनामा हेस्कॉम खात्याने केला असून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे समजते.