|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सिव्हिल हॉस्पिटल आवारात झाड कोसळले

सिव्हिल हॉस्पिटल आवारात झाड कोसळले 

प्रतिनिधी/ बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटल आवारात झाड कोसळल्याने शनिवारी दुपारी एकच धावपळ उडाली. केवळ सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र एका खासगी रुग्णवाहिकेवर फांदी कोसळून नुकसान झाले. शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आपत्कालीन विभागासमोर संरक्षण भिंतीला लागूनच हे झाड होते. संरक्षण भिंतीबाहेर त्याचा बुंदा असला तरी वरील फांद्या मात्र सिव्हिल हॉस्पिटल आवारात पसरल्या होत्या. नेहमी या झाडाच्या सावलीखाली रुग्णांचे नातेवाईक बसलेले असतात.

शनिवारी दुपारीही एक महिला बसली होती. मात्र झाड कोसळताना झालेल्या आवाजामुळे ती तेथून धावत सुटली. त्याचवेळी संरक्षण भिंतीला लागूनच उभी करण्यात आलेल्या एका खासगी रुग्णवाहिकेवर त्याची फांदी पडून नुकसान झाले. त्यानंतर नागरिकांची गर्दी झाली. या झाडाच्या पूर्ण फांद्या कापून वनखात्याने ते ताब्यात घेतले.